24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्रीडाअटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची बाजी

अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची बाजी

एकमत ऑनलाईन

मोहाली : भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात २०८ धावांचा डोंगर उभारला होता. पण तरीही त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढावली. मोक्याच्या क्षणी ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडने धडाकेबाज फटकेबाजी केली आणि संघाला दमदार विजय मिळवून दिला. मॅथ्यूने यावेळी ऑस्ट्रेलियाला विजयाचे वेड लावले, अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती.

भारताच्या २०९ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने आक्रमक सुरुवात केली. दुस-या षटकात त्यांनी तब्बल ४ चौकार लगावले. पण त्यानंतर अक्षर पटेलने आरोन फिंचला बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर कॅमेरून ग्रीन आणि स्टीव्हन स्मिथ यांची चांगलीच भागीदारी रंगली. या दोघांनी दुस-या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. ग्रीनने यावेळी आपले धडाकेबाज अर्धशतकही साकारले. या दोघांनाही यावेळी भारतीय खेळाडूंनी झेल सोडत जीवदानही दिले. सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकतोय, असे वाटत होते. पण त्याचवेळी अक्षर पटलने ग्रीनला बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. ग्रीनने यावेळी ३० चेंडूंत ६१ धावांची दमदार खेळी साकारली. ग्रीन बाद झाल्यावर स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल ही अनुभवी जोडी मैदानात होती. पण उमेश यादवने यावेळी एकाच षटकात या दोघांना बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले.

लोकेश राहुलचे धडाकेबाज अर्धशतक आणि सूर्यकुमार यादवच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ६ बाद २०८ अशी मोठी धावसंख्या उभारता आली. हार्दिकने यावेळी ३० चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकाराच्या जोरावर नाबाद ७१ धावांची खेळी साकारली. रोहित आणि विराट एकामागून एक झटपट बाद झाल्यावर भारतीय संघाचा डाव आता गडगडणार, असे वाटत होते. पण त्यावेळी भारतीय संघासाठी लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादव धावून आले. या दोघांनी यावेळी कसलीही तमा बाळगली नाही. सुरुवातीपासूनच या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली.

राहुलने यावेळी दमदार फटकेबाजी करत आपले अर्धशतक साकारले. राहुलचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. गेल्या सामन्यातही राहुलने अर्धशतक झळकावले होते. या सामन्यात राहुलने ३४ चेंडूंत ५५ धावांची दमदार खेळी साकारली, यामध्ये चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.

राहुल बाद झाल्यावर सूर्यकुमारने संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याला सूर्यकुमारला यावेळी हार्दिक पंड्याची चांगली साथ मिळाली. या दोघांनी गोलंदाजीवर कडक प्रहार केला आणि संघाची धावगती चांगली वाढवली. पण सूर्यकुमार बाद झाला आणि ही जोडी फुटली. सूर्यकुमारचे अर्धशतक यावेळी फक्त चार धावांनी हुकले. सूर्यकुमारने यावेळी दोन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ४६ धावांची दणदणीत खेळी साकारली. सूर्यकुमार यादव बाद झाल्यावर यावेळी अक्षर पटेलला बढती देण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला. पण हा निर्णय यशस्वी ठरला नाही. कारण अक्षर यावेळी फक्त सहा धावांवर बाद झाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या