23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeक्रीडाआवेश खानला संघात संधी शमी; सॅमसन, इशान बाहेर

आवेश खानला संघात संधी शमी; सॅमसन, इशान बाहेर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील १५ जणांचा संघ आशिया कप जिंकण्यासाठी मैदानात उतरला आहे. टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे. अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा संघ निवडीकडे लागल्या होत्या.

संघात सतत फ्लॉप होत असलेल्या आवेश खानला संधी देण्यात आली आहे. आवेशने या वर्षात १३ टी-२० सामने खेळले आहेत आणि ३२ च्या सरासरीने फक्त ११ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर संघात निवड होण्यास पात्र असलेले अनेक खेळाडू होते, पण त्यांना संधी मिळाली नाही.

आशिया चषक स्पर्धेत जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टीम इंडियाचा भाग होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत मोहम्मद शमीच्या रूपात अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारसोबत सलामीच्या स्पेलमध्ये असणे टीम इंडियासाठी फायदेशीर ठरले असते. टीम इंडियाच्या संघात भुवनेश्वरव्यतिरिक्त अर्शदीप सिंग आणि आवेश खान हे एकमेव स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज आहेत. मात्र, दोघांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नाही.

आशिया चषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघात इशान किशनचा समावेश नाही. आयपीएलनंतर त्याला सतत टी-२० संघात संधी मिळत होती आणि अचानक त्याला वगळण्यात आले. इशान त्याच्या बॅटनेही चांगली कामगिरी करत होता. यावर्षी या धडाकेबाज फलंदाजाने १४ टी-२० सामने खेळून ४३० धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ८९ धावा आहे. त्याने ३ अर्धशतकांसह १३०.३० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या