कराची : पाकिस्तानचा कर्णधार पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने एक विशेष विक्रम केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने हा विक्रम केला आहे. बाबरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०,००० धावा पूर्ण केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारा तो पाकिस्तानचा ११ वा फलंदाज बनला आहे.
बाबरने २०४ आंतरराष्ट्रीय सामन्यात कारकिर्दीतील दहा हजार धावा पूर्ण केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण करणारा बाबर हा आशियातील सर्वात वेगवान फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०,००० धावा करणारा बाबर जगातील पाचवा फलंदाज आहे.
त्याच्या वर सर व्हिव्ह रिचर्ड्स, हाशिम आमला, ब्रायन लारा आणि जो रूट आहेत.
बाबर आझमने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. कोहलीने २३२ डावांमध्ये हा विक्रम केला होता, मात्र बाबरने २२८व्या डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या.