25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeक्रीडाबाबर ठरला एक नंबरी फलंदाज!

बाबर ठरला एक नंबरी फलंदाज!

एकमत ऑनलाईन

मुंबई: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम हा जगातील पहिल्या क्रमांकाचा एकदिवसीय फलंदाज ठरला आहे.२६ वर्षीय बाबरने तब्बल १२५८ दिवस पहिल्या क्रमांकावर विराजमान असलेल्या भारताच्या विराट कोहलीला मागे टाकत ही कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेतील दमदार कामगिरीचा बाबरला फायदा झाला. आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार, बाबरकडे सध्या ८६५ गुण आहेत. विराटपेक्षा बाबर ८गुणांनी पुढे आहे. तर, टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा तिर्स­या क्रमांकावर आहे.

जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल ठरलेल्या पाकिस्तानी फलंदाजांमध्ये बाबरने आता चौथे स्थान मिळवले आहे. त्याच्यापूर्वी झहीर अब्बास (१९८३-८४), जावेद मियांदाद (१९८८-८९) आणि मोहम्मद युसूफ यांनी ही कामगिरी केली आहे. २०१० आणि २०१२च्या १९ वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा बाबर २०१५ पासून पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाचा भाग आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी त्याच्या खात्यात ८३७ रेटिंग गुण होते, परंतु पहिल्या सामन्यात त्याने शानदार शतकी खेळी केली. त्यानंतर तिस-या व निर्णायक सामन्यात त्याने ९४ धावा ठोकल्या आणि ही मालिका पाकिस्तानने २-१ अशी नावावर केली. या क्रमवारीत न्यूझीलंडचा रॉस टेलर चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमान सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर, शिखर धवन १७व्या स्थानावर आहे.

परप्रांतीय मजुरांचे स्­थलांतर सुरुच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या