23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeक्रीडाबॅडंिमटनपटू आदित्यने जिंकल्या एकाच महिन्यात तीन राज्य स्पर्धा

बॅडंिमटनपटू आदित्यने जिंकल्या एकाच महिन्यात तीन राज्य स्पर्धा

एकमत ऑनलाईन

नागपूर : एखाद्या गोष्टीची मनापासून आवड असेल आणि त्या दिशेने तुम्ही कसून मेहनत घेतली तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. त्यातच आपण गुरू मानलेल्या प्रशिक्षकावर त्यांच्या विचारावर आणि कर्तृत्वावर श्रद्धा ठेवली तर यशाला गवसणी घालता येते हे लहानगा बॅडंिमटनपटू आदित्य याऊलने आपल्या कामगिरीने ते सिद्ध केले. अवघ्या दहा वर्षांच्या आदित्यने गेल्या महिन्यात एकापाठोपाठ तीन राज्य बॅडमिंटन स्पर्धा जिंकून आपण ‘लंबी रेस का घोडा’ असल्याचे दाखवून दिले.

आदित्यचे आतापर्यंतचे भन्नाट प्रदर्शन लक्षात घेता ‘मूर्ती छोटी, पण कामगिरी मोठी’ ही म्हण त्याच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरते. कोराडी रोडवरील स्मृतीनगरमध्ये राहणा-या आदित्यला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. विरंगुळा म्हणून घराच्या कंपाउंडमध्ये वडिलांसोबत बॅडमिंटन खेळत असताना वडिलांनी बॅडमिंटनसाठी आवश्यक असलेले त्याच्यातील ‘हॅण्ड आय कोऑर्डीनेशन’ अचूक हेरले. आदित्यमधील गुणवत्ता आणि कल बघून त्यांनी अधिक वेळ न घालविता सहाव्याच वर्षी आदित्यला बॅडमिंटनच्या कोर्टवर उतरविले. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात प्रशिक्षक अमित राऊत यांनी सकाळ-संध्याकाळ मेहनत घेत या हि-याला पैलू पाडण्याचे काम केले. कठोर परिश्रमाच्या जोरावर अल्पावधीतच आदित्यने आपली गुणवत्ता सिद्ध केली.

आदित्यने गेल्या चार वर्षांत जिल्हा व खासदार चषकासह अनेक स्थानिक स्पर्धा गाजविल्या. मात्र, खरा धमाका त्याने मागच्या ऑगस्ट महिन्यात केला. महिनाभरात त्याने एक नव्हे, दोन नव्हे तब्बल तीन राज्य बॅडंिमटन स्पर्धांमध्ये सलग तीन विजेतेपद जिंकून स्वत:ची छाप सोडली. २ ऑगस्टला सांगलीमध्ये ११ वर्षे वयोगटात एकेरी व १३ वर्षे वयोगटात दुहेरीचे विजेतेपद मिळविल्यानंतर १५ दिवसांनी पालघरमध्येही ११ वर्षे वयोगटात अजिंक्यपद पटकाविले. लगेच अंधेरी (मुंबई) येथे झालेल्या राज्य ज्युनिअर स्पर्धेतही ११ वर्षे वयोगटात त्याने विजेतेपदावर स्वत:चे नाव कोरले. भवन्स कोराडी शाळेत पाचव्या इयत्तेत शिकत असलेल्या आदित्यला भविष्यात राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे. बॅडमिंटनच्या कोर्टवर आदित्यची सुरू असलेली धमाल कामगिरी बघता नागपूरचा हा तारा निश्चितच नजिकच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकेल, यात तिळमात्र शंका नाही.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या