23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeक्रीडाबजरंग पुनियाला कांस्यपदक!

बजरंग पुनियाला कांस्यपदक!

एकमत ऑनलाईन

टोकियो : भारताच्या बजरंग पुनियाला ६५ किलो वजनी गटातील कांस्यपदकाच्या लढतीत कझाकिस्तानच्या डौलेट नियाझबेकोव्हकडून कडवी टक्कर मिळाली. संपूर्ण स्पर्धेत बचावात्मक खेळ करणारा बजरंग शनिवार दि़ ७ आॅगस्ट रोजी आक्रमक पवित्र्यात दिसला आणि त्या जोरावर त्याने कांस्यपदक नावावर केले. कांस्यपदकाच्या लढतीतही बजरंगने सावध सुरुवातीवरच भर दिला. पहिल्या मिनिटांत प्रतिस्पर्धी खेळाडूची ताकद आजमावल्यानंतर बजरंगने काहीसा आक्रमक खेळ केला.

त्याने ३० सेकंदाच्या पेनल्टी कालावधीत एक गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर नियाझबेकोव्हने त्याची पकड करण्याचा प्रयत्न केला, परंतु बजरंगने यश मिळवत त्याची पकड सैल केली. पहिल्या तीन मिनिटांत बजरंगने २-० अशी आघाडी घेतली. बजरंग मुळ आक्रमक पवित्र्यात परतला अन सातत्याने कझाकिस्तानच्या खेळाडूवर दडपण निर्माण केले. बजरंगने अँकल पकड करताना खात्यात आणखी दोन गुण जमा केले अन आघाडी ४-० अशी भक्कम केली. बजरंगने काऊंटर अटॅक करताना पुन्हा दोन गुण घेतले. बजरंगला ८-० असा सामना जिंकला.

उपांत्य फेरीत बजरंगला २०१६च्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धेतील ( ५७ किलो वजनी गट) कांस्यपदक विजेत्या अझरबैजानच्या आलीयेव्ह हाजीने पराभूत केले. हिल्या तीन मिनिटांत हाजीने ४-१ अशी आघाडी घेतली होती. दुसºया टप्प्यात अझरबैजानच्या खेळाडूने भारी डाव टाकून ८-१ अशी आघाडी घेतली. अखेरच्या एक मिनिटांत त्याला पाच गुणांची पिछाडी भरून काढायची होती. बजरंगने चार गुण घेतले, परंतु त्याने तीन गुण दिलेही. त्यामुळे बजरंगला ५-१२ अशी हार मानावी लागली.

राष्ट्रकुलमध्ये मिळविले होते सुवर्ण
२०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत बजरंगने सुवर्णपदक जिंकले आहे. त्याच्या नावावर २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे रौप्यपदक आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत बजरंगने २०१९ व २०१३ चे कांस्य आणि २०१८चे रौप्यपदक आहे. आशियाई स्पर्धेतही त्याने एक सुवर्ण ( २०१८) व एक रौप्य ( २०१४) पदक जिंकले आहे. २०१५मध्ये त्याला अर्जुन पुरस्कार, २०१९मध्ये पद्मश्री व खेल रत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले; मेजर ध्यानचंद असे नामकरण

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या