25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeक्रीडाकोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना स्थगित

कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना स्थगित

एकमत ऑनलाईन

मुंबई : आयपीएलच्या १४ व्या पर्वावर कोरोनाचे जोरदार वादळ घोंघावत आहे. दि़ ३ मे रोजीच्या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात नियोजित सामना खेळला जाणार होता. मात्र कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. असे वृत्त मिळाले आहे. कोलकाता विरुद्ध बंगळुरू यांच्यातील आयपीएलची मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार होती. परंतु कोलकात्याच्या संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर्स यांना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे.

इतर खेळाडूंची तब्येत चांगली
चक्रवर्ती नुकताच त्याच्या खांद्याच्या स्कॅनसाठी बायो बबलच्या बाहेर गेला होता. त्याच वेळी कोरोनाने त्याला गाठलं असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वरुण चक्रवर्ती आणि वॉरियर वगळता केकेआरचे बाकीचे खेळाडू ठीक आहेत. त्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आहेत.

पॅट कमिन्स आजारी?
कोलकाता नाईट रायडर्सचे बरेच खेळाडू आजारी पडले आहेत. अशा परिस्थितीत उर्वरित खेळाडू आणि कर्मचारी आयसोलेट आहेत. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आजारी पडलेल्या खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचे नावही आहे. संपूर्ण भारतात कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना अशा वातावरणात देखील आयपीएलची स्पर्धा सुरू आहे. संपूर्ण काळजी घेऊन ही स्पर्धा खेळविण्यात येत आहे.

मराठवाड्यात ३ दिवस वादळी वा-यासह पाऊस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या