22.2 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home क्रीडा सुपर ओव्हरमध्ये बंगळुरू विजयी

सुपर ओव्हरमध्ये बंगळुरू विजयी

एकमत ऑनलाईन

अबुधाबी : सलामीवीर फिंच, पडिकल यांची अर्धशतके आणि एबी डिव्हीलियर्सने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर बंगळुरूने (आरसीबी) मुंबईविरोधात २०१ धावांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर प्रारंभी मुंबईची घसरगुंडी झाली. मात्र, इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे निर्धारीत षटकांत बरोबरी साधण्यात यश मिळवले. मुंबईने ५ गडी गमावत २०१ धावांपर्यंत मजल मारली.

इशान किशनच्या ९९ धावा मुंबईच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावा हव्या असताना पोलार्डने चौकार लगावत सामना बरोबरीत सोडवला. त्यामुळे सुपर ओव्हरची लढत रंगली. मात्र, यात मुंबईचा पराभव झाला. आयपीएलच्या या हंगामातील ही दुसरी सुपर ओव्हर होती.

सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या पोलार्ड आणि हार्दिक पांड्या अपयशी ठरले. त्यामुळे मुंबई ७ धावाच करू शकली. त्यामुळे बंगळुरूच्या विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सने पुन्हा विजय खेचून आणला. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूच्या फिंच-पडिकल जोडीने आश्वासक सुरुवात करून संघाची बाजू भक्कम केली.

अखेरीस डिव्हीलियर्सने केलेल्या फटकेबाजीमुळे बंगळुरूला आश्वासक धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. फिंचने ३५ चेंडूत ५२ धावा केल्या. कर्णधार विराट कोहली पुन्हा अपयशी ठरला. मात्र, एबी डिव्हीलियर्सने देवदत पडिकलसोबत फटकेबाजी केली.

पडिकलने ५४ धावांची खेळी केली. त्यानंतर डिव्हीलियर्स आणि शिवम दुबेने मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्यानंतर मुंबईचे आघाडीचे फलंदाज रोहित शर्मा, डीकॉक, सूर्यकुमार स्वस्तात परतल्यानंतर किशन आणि पोलार्डने जोरदार फटकेबाजी करून सामना फिरवला. मात्र, विजयाच्या समिप आलेला असतानाच किशन बाद झाला. त्यामुळे पोलार्डने अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकून सामना बरोबरीत सोडला. मात्र, सुपर ओव्हरमध्ये मुंबईला चमक दाखवता आली नाही. त्यामुळे पराभव पत्करावा लागला.

दिव्यांग व्यक्तीला स्वस्त धान्य दुकानाचे परवाने दया

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या