25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeक्रीडाबंगळुरूचा कोलकातावर दमदार विजय

बंगळुरूचा कोलकातावर दमदार विजय

एकमत ऑनलाईन

चेन्नई : आयपीएलच्या दहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर ३८ धावांनी मात केली. या मोसमात विराटसेनेने आयपीएलमध्ये पहिल्यांदा सलग तीन सामने जिंकत विजयी मालिका कायम ठेवली आहे.

बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत २०५ धावांचे विशाल लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात कोलकाताला २० षटकात ८ बाद १६६ धावांपर्यतच मजल मारता आली. निर्धारीत लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता संघाला शुभमन गिलच्या रूपात पहिला झटका बसला. गिलने ९ चेंडूत २१ धावा केल्या. त्यानंतर राहुल त्रिपाठी २० चेंडूंत २५ धावांवर तंबूत परतला.

नितीश राणा १८ धावा करून चहलच्या पहिल्या चेंडूवर देवदत्त पडिक्­क्­लकडे झेलबाद झाला. यानंतर संघाला दिनेश कार्तिकच्या रुपात चौथा धक्का बसला. चहलने कार्तिकला पायचीत केले. कर्णधार ईयान मॉर्गनला पटेलने २९ धावांवर विराटकरवी झेलबाद केले.

महाविषारी जिवांची दुनिया

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या