23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeक्रीडाकोहली आणि रवी शास्त्रींवर बीसीसीआय नाराज

कोहली आणि रवी शास्त्रींवर बीसीसीआय नाराज

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीवर नाराज आहे. दोघांनी गेल्या आठवड्यात लंडनमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतला. बीसीसीआयच्या एका सूत्राने ही माहिती दिली आहे. शास्त्री रविवारी कोविड -१९ पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर जे शास्त्रींच्या संपर्कात होते त्यांचीही सोमवारी पॉझिटिव्ह चाचणी समोर आली. टीम इंडियाचे फिजिओ नितीन पटेल सध्या आयसोलेशनमध्ये आहेत.

बीसीसीआयच्या एका अधिका-याने सांगितले, ‘कार्यक्रमाचे फोटो बीसीसीआयच्या अधिका-यांसोबत शेअर केले गेले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या प्रकरणाची चौकशी करेल. या प्रकरणामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला लाज वाटली आहे. प्रशिक्षक आणि कर्णधार यांना ओव्हल कसोटीनंतर संपूर्ण प्रकरणाबद्दल प्रश्न विचारले जातील. संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक गिरीश डोंगरे यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

ब्रिटिश माध्यमांनुसार, भारतीय संघाने या संदर्भात इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून मंजुरी घेतली नव्हती. अधिकारी पुढे म्हणाले, बीसीसीआय या प्रकरणाबाबत ईसीबीच्या संपर्कात आहे आणि कोणत्याही अडचणीशिवाय मालिका पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या प्रत्येकजण शास्त्री लवकर बरे होतील अशी आशा करत आहेत. बुधवारी आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषकासंदर्भात निवड बैठकही आहे. कदाचित हा मुद्दा तिथेही उपस्थित केला जाऊ शकतो.

अतिथी संघाच्या सदस्यांना अशा ठिकाणी जाण्याची परवानगी आहे जिथे जास्त गर्दी नाही. मोठ्या संख्येने लोक उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने दोन्ही बोर्ड अडचणीत आले आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या