22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeक्रीडास्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआयने मागवले अर्ज

स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआयने मागवले अर्ज

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी मुख्य प्रायोजक म्हणून विवो या चिनी मोबाईल कंपनीसोबतचा करार मोडल्यानंतर बीसीसीआयने तेराव्या हंगामाच्या स्पॉन्सरशिपसाठी नवीन निविदा मागवल्या आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी एक पत्रक जाहीर करत याबद्दल माहिती दिली.

तसेच स्पॉन्सरशिपसाठी निविदा भरत असताना बीसीसीआयने कंपन्यांसाठी काही नियम व अटीही घातल्या आहेत. कोणत्याही निविदा प्रक्रियेत सर्वोच्च बोली लावणा-यांना यश मिळते, परंतु आयपीएल प्रायोजकत्वासाठी सर्वोच्च बोली लावणा-यांनाच अधिकार मिळतील असे आवश्यक नसणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत बीसीसीआय यूएईमध्ये आयपीएलचा तेरावा हंगाम खेळवणार आहे.

बीसीसीआयचे नियम :
१) ज्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल ही किमान ३०० कोटी इतकी आहे अशाच कंपन्यांनी आपली निविदा पाठवावी. तसेच ज्या कंपन्यांची उलाढाल ही ३०० कोटी इतकी आहे त्यांनी आपले ऑडिट रिपोर्ट सोबत पाठवणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
२) नवीन स्पॉन्सर्ससोबत साडेचार महिन्यांचा करार केला जाईल. १४ ऑगस्टपर्यंत अर्ज जमा केले जातील तर ज्या कंपनीला कंत्राट मिळेल त्याचे नाव १८ ऑगस्ट रोजी जाहीर केले जाईल. स्पॉन्सरशिपचे हक्क १८ ऑगस्ट २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालवधीपर्यंतच असतील.
३) बोर्डाने स्पष्ट केले की, मध्यस्थ किंवा एजंट या प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाहीत. कोणत्याही निविदेत मध्यस्थाचा सहभाग आढळला तर अशाप्रकारच्या बोली रद्द केल्या जातील. यासाठी बीसीसीआयचे अधिकारी, कर्मचारी किंवा एजंट कोणत्याही परिस्थितीत किंमत, देणगी, नुकसान किंवा कोणत्याही प्रकारच्या खर्चासाठी जबाबदार असणार नाहीत.
४) सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे निविदेत सर्वाधिक रक्कम लावून हक्क मिळणार नाहीत. तर कंपनीचा ब्रँड हा आयपीएलसाठी किती फायदेशीर आहे हा विचारही केला जाईल.

बायकोसोबत घराबाहेर पडला जडेजा : पोलिसांसोबत घातली हुज्जत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या