नवी दिल्ली : बीसीसीआयची दोन पदे मागील एक वर्षापासून रिक्त पडली होती. नैतिकता आणि लोकपाल अधिकारी ही ती पदे आहेत ज्यांच्यावर एक वर्षापासून कोणालाही नियुक्त केले गेले नाही. त्यावर बोर्डाने आता सुप्रीम कोर्टचे माजी न्यायाधीश विनीत सरण यांची नियुक्ती केली आहे.
या पदांवर विनीत सरण यांच्याआधी डी. के. जैन हे कार्यरत होते. जैन यांचा कार्यकाळ मागील वर्षाच्या जून महिन्यात संपला होता. त्यानंतर ते पद रिकामेच राहिले होते. सरण यांच्या नियुक्तीबद्दल बीसीसीआयच्या एका अधिका-यांनी म्हटले, माननीय सरण यांना मागील महिन्यातच नियुक्त केले गेले आहे.
सरण यांनी ओडिशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांनी कर्नाटक आणि अलाहाबाद न्यायालयातही न्यायाधीश म्हणून काम केले आहे.