22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeक्रीडाबीडच्या अविनाश साबळेची वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतील संधी हुकली

बीडच्या अविनाश साबळेची वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतील संधी हुकली

एकमत ऑनलाईन

बीड : बीडच्या गावखेड्यातील धावपटू अविनाश साबळेची वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी हुकली. जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत तो ११ व्या स्थानावर राहिला. अविनाशने ही शर्यत ८:३१.७५ वेळेत पूर्ण केली.

सुवर्णपदक सूफीन अलने ८.२५.१३, रौप्यपदक गिरमाने ८.२६.०१, कांस्यपदक किप्रुटोने ८.२७.९२ जिंकले आहे. साबळे २०१९ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यावेळेस अविनाश १३ व्या स्थानावर होता. त्याने जूनमध्ये डायमंड लीगमध्ये ८.१२:४८ वेळेसह विक्रम केला.

अविनाशच्या आधी मुरली श्रीशंकरच्या हाती लांब उडीत निराशाच लागली. श्रीशंकरने अंतिम फेरीत लांब उडीत सातवे स्थान पटकावले. त्याने अंतिम फेरीत ७.९६ मीटर उडी मारली. मुरली त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीपर्यंत पोहोचू शकला नाही.

मात्र पुरुषांच्या लांब उडीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा श्रीशंकर हा पहिला भारतीय ठरला. आता संपूर्ण देशाची आशा ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रावर आहे. नीरजने गेल्या महिन्यात स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये ८९.९४ मीटर फेक करून राष्ट्रीय विक्रम मोडला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या