16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeक्रीडाकॅनडावर बेल्जियमची मात

कॅनडावर बेल्जियमची मात

एकमत ऑनलाईन

कतार : विश्वचषक स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमने आपली विजयी सुरुवात केली आहे. अहमद बिन अली स्टेडियमवर बुधवारी (२३ नोव्हेंबर) रात्री उशिरा रंगलेल्या सामन्यात बेल्जियमने कॅनडावर मात केली.

कालच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमने कॅनडाचा १-० असा पराभव केला. बेल्जियमच्या विजयाचे सर्व श्रेय मिची बत्सुई आणि गोलकीपर थिबॉट कोर्टोइस या दोन दिग्गज फुटबॉलर्सना जाते. गोलकीपर थिबॉट कोर्टोइसने कॅनडाचा पेनल्टी किकवर गोल करण्याचा प्रयत्न अयशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली. तर, बत्सुईने एक गोल डागत संघाला विजय मिळवून दिला.

फर्स्ट हाफमध्ये दोन्ही संघ आक्रमक दिसून आले. ३६ वर्षांनंतर विश्वचषक खेळण्यासाठी आलेला कॅनडाचा संघ सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत होता. फर्स्ट हाफमध्ये एकूण १४ शॉर्टस् घेतले, पण गोल डागण्यात यशस्वी झाले नाहीत. याचदरम्यान, सामन्याच्या दहाव्या मिनिटाला कॅनडाकडे गोल डागण्याची सुवर्णसंधी आली.

पण तिथेही कॅनडाच्या पदरी निराशाच आली. कॅनडाच्या अल्फोन्सो डेव्हिसने गोल डागण्याचा उत्तम प्रयत्न केला खरा, पण बेल्जियमच्या गोलकीपर थिबॉट कोर्टोइसने अल्फोन्सो डेव्हिसची पेनल्टी किक उत्तमरीत्या वाचवली अन् कॅनडाची गोल डागण्याची संधी हुकली. त्यानंतर बेल्जियमचा फॉरवर्ड खेळाडू मिची बत्सुईने सामन्याच्या ४४ व्या मिनिटाला गोल डागला. या गोलमुळे बेल्जियमने सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. ​

सामन्याच्या सेकंड हाफमध्ये दोन्ही संघांना एकही गोल डागता आला नाही. या हाफमध्ये कॅनडाला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. पण बेल्जियमचा गोलकीपर कोर्टोइसच्या बचावापुढे कॅनडाचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले. अखेर बेल्जियमने १-० अशा फरकाने सामना जिंकत तीन गुण मिळवले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या