27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeक्रीडाभुवनेश्वर दुखरी नसच; टीम इंडियाची डेथ ओव्हरमध्ये पुन्हा धुलाई

भुवनेश्वर दुखरी नसच; टीम इंडियाची डेथ ओव्हरमध्ये पुन्हा धुलाई

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी हैदराबादमध्ये तिसरा टी-२० सामना खेळला गेला. मालिकेतील या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत १८६ धावा केल्या, या सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी पुन्हा एकदा कमकुवत दिसून आली. कारण शेवटच्या षटकांमध्ये टीम इंडियाच्या प्रत्येक गोलंदाजाने जास्त धावा दिल्या, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात वेगवान सुरुवात केली, मात्र मधल्या फळीत सततच्या धक्क्यांमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. एकवेळ असे वाटत होते की ऑस्ट्रेलियाचा डाव १६० पर्यंत जाईल, परंतु टीम डेव्हिड आणि डॅनिएल सॅम्स यांनी ऑस्ट्रेलियासाठी धावांचा पाऊस पाडला. अखेरच्या चार षटकांत भारताच्या एकूण ५३ धावा यावरून भारतीय संघाच्या खराब गोलंदाजीचा अंदाज लावता येतो. यावेळी भुवनेश्वर कुमारने १९ वे षटक केले नसले तरी १८ व्या षटकात २१ धावा दिल्या.

भारताने शेवटी ३ षटकांत ४६ धावा दिल्या
भारताकडून शेवटची ३ षटके तीन वेगवेगळ्या गोलंदाजांनी टाकली. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांनी टीम इंडियासाठी १८ वी, १९ वी आणि २० वी षटके टाकली, ज्यात भारताने ४६ धावा दिल्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या