लंडन : भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. क्रिकेट जगतात त्याची स्विंगमास्टर म्हणून ओळख आहे. भुवनेश्वर कुमारने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात मोठ इतिहास रचला आहे. भुवनेश्वर कुमार हा आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. भुवनेश्वर कुमारने १४ वेळा पहिल्याच षटकात यश मिळवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुस-या टी-२० सामन्यात भुवनेश्वरने हा विक्रम केला आहे. त्याच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने दुस-या टी-२० सामन्यात इंग्लंडचा ४९ धावांनी पराभव केला आहे. तर ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुस-या टी-२० सामन्यात भारताना प्रथम खेळताना ८ विकेट गमावत १७० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लडचा संघ १७ षटकांत १२१ धावाच करु शकला. या सामन्यात भारताने इंग्लडचा ४९ धावांनी पराभव करत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.