16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeक्रीडामॅक्सवेलसोबत मोठी दुर्घटना; हाता-पायाला जबर मार

मॅक्सवेलसोबत मोठी दुर्घटना; हाता-पायाला जबर मार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाला ग्लेन मॅक्सवेलच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. मॅक्सवेलचा पाय फ्रॅक्चर झाल्याने अष्टपैलू खेळाडू या संपूर्ण उन्हाळी हंगामात ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळू शकणार नाही.

ग्लेन मॅक्सवेलचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. यानंतर आता तो जवळपास ३-४ महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. मॅक्सवेल हा टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. मॅक्सवेलने टी-२० विश्वचषकाच्या चार सामन्यांत ३९.३३ च्या सरासरीने एकूण ११८ धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १६१.६४ होता.

वास्तविक, मॅक्सवेल मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता. तिथे त्याच्यासोबत हा अपघात झाला. मित्राच्या घरामागे अंगणात धावत येत होता. यादरम्यान त्याचा पाय घसरला. या घटनेनंतर मॅक्सवेल बराच काळ क्रिकेटपासून दूर राहणार हे मात्र नक्की आहे. पुढील आठवड्यापासून इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणा-या मालिकेत मॅक्सवेलचा समावेश करण्यात आला होता पण आता तो या मालिकेतून बाहेर पडला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या