23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeक्रीडाझिम्बाब्वे दौ-यापूर्वी भारताला मोठा झटका; वॉशिंग्टन सुंदरला दुखापत

झिम्बाब्वे दौ-यापूर्वी भारताला मोठा झटका; वॉशिंग्टन सुंदरला दुखापत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात येत्या १८ ऑगस्ट २०२२ पासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे.

या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर झिम्बाब्वे दौ-यावर रवाना होण्यापूर्वी दुखापतग्रस्त झाला आहे. सुंदरची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे झिम्बाब्वे दौ-यावर जाणार की नाही? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. काऊंटी क्रिकेटमध्ये वॉशिंग्टन सुंदरचे दमदार प्रदर्शन

वॉशिंग्टन सुंदर गेल्या दोन वर्षांपासून दुखापतीशी झुंजतोय. नुकतेच त्याने काऊंटी क्रिकेटद्वारे मैदानात पुनरागमन केले होते. काऊंटी क्रिकेटमध्ये सुंदरने चेंडूने अप्रतिम कामगिरी दाखवली. त्याने काऊंटी क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यातच पाचहून अधिक विकेट्स घेतल्या. इतकेच नाही तर काऊंटी क्रिकेटदरम्यान त्याने शानदार अर्धशतक झळकावले.

मात्र आता सुंदरला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. रॉयल लंडन वन डे चषकात लँकेशायर आणि वूस्टरशायर यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात सुंदर सहभागी झाला होता. परंतु, क्षेत्ररक्षण करताना सुंदरला दुखापत झाली. त्यावेळी सुंदरला मैदानाबाहेर जावे लागले होते. आता या सामन्यात त्याला गोलंदाजी करता येणार नसल्याची माहिती सुंदरच्या संघाने दिली आहे.

आयपीएल २०२२ नंतर वॉशिंग्टन सुंदर भारतीय संघाचा भाग बनला. ऑस्ट्रेलिया दौ-यावर गब्बाच्या ऐतिहासिक सामन्यातील विजयात त्याने बॅट आणि चेंडूने महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. यानंतर इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतही सुंदरची कामगिरी चांगली होती. त्यानंतर मात्र सुंदरला दुखापतींना सामोरे जावे लागले. यंदाच्या आयपीएलमध्येही सुंदरला दुखापत झाली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या