24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeक्रीडाक्रीडा क्षेत्राला मोठा धक्का : माजी रणजीपटू शेखर गवळी यांच निधन

क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का : माजी रणजीपटू शेखर गवळी यांच निधन

एकमत ऑनलाईन

नाशिक | माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा मृतदेह सापडला आहे. रेस्क्यू टीमला बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास दरीत त्यांचा मृतदेह आढळला.

नाशिकच्या इगतपुरी परिसरात शेखर गवळी हे काही सहकाऱ्यांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते. त्यावेळी पाय घसरुन ते अचानक पडले आणि थेट दरीत कोसळले. शेखर गवळी यांचा शोध मंगळवार संध्याकाळपासून सुरु होता. आज सकाळी गवळी यांचा मृतदेह हाती लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेने क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. शेखर गवळी हे महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

माजी रणजीपटू शेखर गवळी ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या