23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeक्रीडासंघात मोठे बदल होण्याची शक्यता : गांगुली

संघात मोठे बदल होण्याची शक्यता : गांगुली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघासोबत माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा मेंटॉर म्हणून जाणार असून २००७ नंतर आतापर्यंत संघाने कधीच टी-२० विश्वचषक जिंकलेला नाही. भारतीय संघाने २००७ साली धोनीच्या नेतृत्वाखालीच खेळवण्यात आलेल्या टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.

पण केवळ या स्पर्धेपुरताच धोनी संघासोबत असणार आहे. भारतीय संघासोबत दिर्घ काळ धोनीला सपोर्टिंग स्टाफ म्हणून राहण्याची इच्छा नसल्याचे सांगण्यात आले आहे. हा खुलासा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असणा-या सौरव गांगुलीने केला आहे. तसेच भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकानंतर संपत आहे. विश्वचषक स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. म्हणजेच शास्त्री हे केवळ दोन महिन्यांसाठी भारतीय संघासोबत असणार आहेत.

केवळ टी-२० विश्वचषक स्पर्धेपुरता धोनी संघासोबत असणार आहे. बीसीसीआयला यासंदर्भातील माहिती धोनीने यापूर्वीच दिल्याचे गांगुलीने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत भारताने सर्व टी-२० विश्वचषक स्पर्धा धोनीच्या नेतृत्वाखालीच खेळल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सर्वच आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. भारताला २०१३ नंतर एकही आयसीसीची स्पर्धा जिंकता आलेली नाही. भारताला शेवटी स्पर्धा ही धोनीच्या नेतृत्वाखालीच ंिजकता आलेली. मुलाखतीमध्ये गांगुलीने दिलेल्या माहितीनुसार अनेक देश आपल्या वरिष्ठ, माजी खेळाडूंची मदत घेतात. त्यामुळे संघाला फार फायदा होतो, असेही गांगुलीने म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या