22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeक्रीडावेस्ट इंडिज दौ-यासाठी चार्टर फ्लाईट बुक; बीसीसीआयचा निर्णय

वेस्ट इंडिज दौ-यासाठी चार्टर फ्लाईट बुक; बीसीसीआयचा निर्णय

एकमत ऑनलाईन

मुंबई : कसोटी मालिका अनिर्णीत राहिली पण टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत इंग्लंड दौ-यावर टीम इंडियाची कामगिरी काहीशी चांगली नव्हती. भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा २२ जुलैपासून सुरू होत आहे. भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध चार्टर फ्लाईटने कॅरेबियन भूमीवर पाऊल ठेवणार आहे.

संघ पोर्ट ऑफ स्पेनला जाणार आहे. खेळाडूंना कोरोनापासून वाचवण्यासाठी बीसीसीआयने चार्टर फ्लाईट बुक केली आहे. कोरोनाच्या एका प्रकरणामुळे मालिका धोक्यात येऊ शकते.

या दौ-यासाठी तीन मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी रोहित-पंत यांना सुटी देण्यात आली आहे. कुणाला विश्रांती देणार, कुणाला संधी मिळणार, याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा होती. याविषयी क्रिकेटप्रेमींना देखील उत्सुकता निर्माण झाली होती.

वनडे मालिकेत टीम इंडियाची कमान शिखर धवनच्या हाती असेल. रवींद्र जडेजा संघाचा उपकर्णधार असेल. भुवनेश्वर कुमारला वनडे संघात स्थान मिळालेले नाही. त्याचबरोबर शुभमन गिलचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे.

कोण सुटीवर गेले
संपूर्ण दौ-यासाठी विराट कोहली, जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी रोहित शर्मा-ऋषभ पंत वनडे मालिकेत खेळत नसल्यामुळे दोघांनाही सुटी देण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू वेस्ट इंडिजमध्येच सुटी साजरी करणार आहेत.

रोहित शर्मा, ऋषभ पंत, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिक, आवेश खान आणि हर्षल पटेल टी-२० मालिकेत संघात सामील होतील. २९ जुलैपासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या