बर्मिंगहॅम : कॉमनवेल्थ गेम्स २०२२ शुक्रवार २९ जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू झाले आहेत. २८ जुलैला उद्घाटन होणा-या या स्पर्धेचा समारोप आठ ऑगस्ट रोजी होणार आहे.
११ दिवस चालणा-या या खेळांमध्ये ७२ देशांतील सुमारे ५,००० खेळाडू सहभागी होत आहेत. भारताकडून २१५ खेळाडू आपापल्या स्पर्धेत पदक मिळवण्याचा प्रयत्न करतील. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच महिला क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे.
बॉंिक्सगच्या ६३.५ किलो वजनी गटात भारताच्या शिव थापाने पाकिस्तानच्या सुलेमान बलोचचा पराभव केला. राऊंड ३२ मध्ये झालेल्या या सामन्यात भारताच्या शिव थापाने सामन्यावर पहिल्यापासूनच पकड मिळवली. त्याने सामना ५-० अशा फरकाने एकतर्फी जिंकत पाकिस्तानच्या बॉक्सरला डोके वर काढण्याची संधी देखील दिली नाही.