27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeक्रीडाबीसीसीआयच्या निर्णयावर ब्रॅड हॉग नाराज

बीसीसीआयच्या निर्णयावर ब्रॅड हॉग नाराज

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेकडून सलग दोन टी-२० सामन्यांत टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. खराब कामगिरीनंतर ऋषभ पंतच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सध्याच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती, त्यानंतर के. एल. राहुलकडे कर्णधारपद सोपविण्यात आले होते, मात्र के. एल. राहुलला मालिका सुरू होण्यापूर्वीच दुखापत झाली होती. के. एल. राहुल संपूर्ण मालिकेतून बाहेर पडल्यानंतर ऋषभ पंतला कर्णधार बनवण्यात आले आहे.

बीसीसीआयच्या या निर्णयावर ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडू ब्रॅड हॉग खूप नाराज आहेत. ऋषभ पंतच्या जागी अष्टपैलू हार्दिक पांड्याला टीम इंडियाचा कर्णधार बनवायचे होते, असे ब्रॅड हॉगचे मत आहे. हार्दिक पांड्याने नुकतीच गुजरात टायटन्­सला आयपीएल २०२२ ची ट्रॉफी जिंकून दिली आहे.

ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रॅड हॉग म्हणाला, के. एल. राहुलनंतर हार्दिक पांड्या टी-२० मालिकेत कर्णधार व्हायला हवा होता. आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे. कठीण परिस्थितीत तो चांगली कामगिरी करतो. प्रतिकूल परिस्थितीत हार्दिक पांड्या बॅट असो वा चेंडू चांगली कामगिरी करत आहे.

जागतिक क्रिकेटमधील सर्वांत मौल्यवान टी-२० क्रिकेटर सध्या हार्दिक पांड्या आहे. पहिल्या टी-२० सामन्यामध्ये पांड्या शेवटच्या षटकात फलंदाजीला आला आणि पहिल्याच चेंडूपासून चौकार मारून डावाला सुरुवात केली. टीम इंडियाने सुरुवातीलाच विकेट गमावल्या तर हार्दिक पांड्या वर जाऊन डाव सांभाळू शकतो, असे ब्रॅड हॉग म्हणाला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या