25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeक्रीडाअन्नू राणीला भालाफेक स्पर्धेत कांस्यपदक

अन्नू राणीला भालाफेक स्पर्धेत कांस्यपदक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कॉमनवेल्थ भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताची महिला भालेफेकपटू अन्नू राणीने कांस्यपदक पटकावलंय. या स्पर्धेत तिनं ६० मीटर भालाफेक करून तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. ऑस्ट्रेलियाच्या केल्सीने ६४ मीटर अंतर पार करून सुवर्णपदक पटकावले आहे.

भारताची स्टार भालाफेकपटू अन्नू राणीनं कॉमनवेल्थ स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. या स्पर्धेतील सुवर्ण आणि रौप्य पदक ऑस्ट्रेलियाच्या खात्यात जमा झाली.

कॉमनवेल्थ भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अन्नू राणीसमोर ऑस्ट्रेलियाची केल्सी आणि मॅकेन्झीचे मोठे आव्हान होते. या फेरीत केल्सीने ६४.४३ मीटर भाला फेकून सुवर्णपदकावर कब्जा केला. तर, मॅकन्झीने ६४.२७ मीटर भालाफेकून रौप्यपदक जिंकले. त्यानंतर अन्नू राणीने ६४ मीटर भालाफेक करत कांस्यपदकावर नाव कोरलं.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या