22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडाअफगाणिस्तानमध्ये भारताच्या विजयाचा जल्लोष

अफगाणिस्तानमध्ये भारताच्या विजयाचा जल्लोष

एकमत ऑनलाईन

दुबई : यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत २०२२ रविवारी रात्री झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे तुफान आलेच पण जगभरातील क्रिकेटप्रेमी एका रोमहर्षक सामन्याचे साक्षीदार ठरले. यावेळी अफगाणिस्तानमध्येही काही क्रिकेटप्रेमींनी भारताचा विजय अगदी मनापासून साजरा केला. यावेळी एका चाहत्याने हार्दिक पांड्याच्या विजयी षटकारावर थेट टीव्ही स्क्रिनवर पांड्या असताना त्याला किस दिल्याचं दिसून आलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण भारत-पाकिस्तान सामना पाहताना दिसत आहेत. दरम्यान, हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात षटकार ठोकून टीम इंडियाला विजय मिळवून दिला तेव्हा यातील एक तरुण उठून भारताच्या विजयाचा आनंद साजरा करताना दिसतो. तो थेट टेलिव्हिजन स्क्रीनवर जातो आणि हार्दिक पांड्याला किस करतो. यावेळी खोलीत उपस्थित बाकीचे तरुण हसताना दिसत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या