23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्रीडाआयपीएलच्या १३ व्या हंगामाला केंद्र सरकारची मंजुरी

आयपीएलच्या १३ व्या हंगामाला केंद्र सरकारची मंजुरी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आयपीएलचा तेरावा हंगाम भरवण्यासाठी बीसीसीआयसमोरचा रस्ता आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने भारतीय खेळाडूंना युएई प्रवासाची परवानगी दिली असून १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून नवीन वेळापत्रकानुसार अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. याचसोबत सर्व सामने हे रात्री साडेसात वाजता सुरु होणार आहेत.

तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल रविवारी गव्हर्निंग कौन्सिलची बैठक आयोजित करण्यात आली होती. याआधी तेराव्या हंगामाचा अंतिम सामना हा ८ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार होता. परंतु कोरोनामुळे तयार करण्यात आलेले नवीन नियम, भारतीय संघाचा आगामी ऑस्ट्रेलिया दौरा आणि दोन सामन्यांमध्ये खेळाडूंना पुरेसा वेळ मिळाला. यासाठी स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तारीख बदलून ८ ऐवजी १० करण्यात आल्याचे समजते. सध्याच्या हंगामासाठी व्हिवो हीच मुख्य स्पॉन्सर असेल, असेही यावेळी सांगण्यात आले.

स्पर्धेला प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळणार का यावरही गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यांनी माहिती दिली. खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानात प्रेक्षक असले तर चांगलेच आहे. परंतु खेळाडू आणि पर्यायाने प्रेक्षकांची सुरक्षा हादेखील महत्वाचा मुद्दा आहे. यासाठी यूएई क्रिकेट संघटनेसोबत चर्चा करून योग्यवेळी निर्णय घेतला जाईल. गव्हर्निंग कौन्सिलने सर्व संघमालकांना खेळाडूंच्या व्हिसाची प्रक्रिया सुरू करण्याचेही आदेश दिले आहेत.

Read More  वाढता कोविड-१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूर महापालिकेचे युद्धपातळीवर प्रयत्न

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या