24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeक्रीडाचहलने गुजरातला दिली इन्स्टा हॅक करण्याची धमकी

चहलने गुजरातला दिली इन्स्टा हॅक करण्याची धमकी

एकमत ऑनलाईन

मुंबई : युजवेंद्र चहल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याची कोणती पण पोस्ट केलेला फोटो चांगलीच व्हायरल होते. सतत सक्रिय असल्यामुळे त्याला सोशल मीडियाचा राजा मानले जाते. गुजरात टाइंट्सचे सोशल मीडिया पाहणा-या अ‍ॅडमिनला चहलने धमकी दिली आहे. राजस्थानच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये चहल गुजरात टायटन्सच्या अ‍ॅडमिनला त्याचे काही फोटो पाठव असे बोलत आहे.

अनुभवी फिरकी गोलंदाज राशिद खानसोबत चहल फोटोसाठी पोज देत व्हिडिओमध्ये उभा दिसत आहे. त्यादरम्यान चहल म्हणाला की, मी तुमच्या इन्स्टा वर किती मेसेज केले आहे. माझा फोटो कुठे आहे. आजपर्यंत मला एकही रिप्लाय आलेला नाही. मी तुमच इन्स्टा हॅक करेन, माझ्या बरोबर सोशल मीडियावर पंगा घेऊ नका.

चहलच्या बोलण्यावर राशिदही हसायला लागला. गुजरातसोबतच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये राजस्थानला ७ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह गुजरातने आयपीएलच्या अंतिम फेरी प्रवेश केला. दुसरीकडे राजस्थान आता क्वालिफायर २ मध्ये एलिमिनेटर सामना जिंकणा-या संघाशी भिडणार आहे. क्वालिफायर २ सामना जिंकणारा संघ फायनल मध्ये गुजरातशी २९ मे रोजी मैदानात उतरणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या