नवी दिल्ली : दीर्घकाळाच्या रिलेशनशिपनंतर दीपक चहर आणि त्याची मैत्रीण जया भारद्वाज यांनी १ जून २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. फतेहाबाद येथील जेपी पॅलेसमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. आयपीएलच्या चौदाव्या हंगामात दीपक चहरने ५३ व्या सामन्यानंतर गर्लफ्रेंड जया भारद्वाजला स्टेडियममध्येच प्रपोज केले. त्या सामन्यानंतर दीपक जयाला प्रपोज करणार नव्हता, पण धोनीच्या सांगण्यावरून त्याने आपला प्लॅन बदलला, अशी माहिती दीपक चहरचे वडील लोकेंद्र सिंह यांनी दिली.
आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील ५३ व्या सामन्यानंतर दीपक चहरने स्टॅण्डमध्ये जाऊन गुडघ्यावर बसून जयाला प्रपोज केले. त्या सामन्यानंतर दीपक जयाला प्रपोज करणार नव्हता, पण धोनीच्या सांगण्यावरून त्याने आपला प्लॅन बदलला. याचा खुलासा दीपकचे वडील लोकेंद्र सिंह चहर यांनी केला. दीपकने दुस-या दिवशी जयाला प्रपोज करण्याची योजना आखल्याचे सांगितले, तर धोनीनं या गोष्टीत उशीर करू नको असे दीपकला सांगितले. त्यानंतर त्याने त्याच दिवशी जयाला प्रपोज केले.
दीपक चहरचे वडील काय म्हणाले?
लोकेंद्र सिंह चहर म्हणाले की, दीपक चहरने आयपीएल २०२२ च्या प्लेऑफ सामन्यात गर्लफ्रेंड जयाला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला होता. दीपकने हे धोनीला सांगितले. त्यानंतर धोनीने या गोष्टीत उशीर करू नकोस, लीग सामन्यादरम्यानच जयाला प्रपोज करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दीपकने धोनीचे म्हणणे ऐकून ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यानंतर मैदानावर जयाला प्रपोज केले.