19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeक्रीडापाक-इंग्लंड सामन्यापूर्वी आयसीसीच्या प्लेईंग कंडिशनमध्ये बदल

पाक-इंग्लंड सामन्यापूर्वी आयसीसीच्या प्लेईंग कंडिशनमध्ये बदल

एकमत ऑनलाईन

मेलबर्न : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात रविवार दि. १३ नोव्हेंबर रोजी टी-२० विश्वचषकातील अंतिम सामना खेळला जाणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर हा एतिहासिक सामना पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी आयसीसीनं प्लेईंग कंडिशनमध्ये काही बदल केले आहेत. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट आहे. मेलबर्न येथील हवामानाचा अंदाज घेऊन आयसीसीच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीनं राखीव दिवसाच्या वेळेत अतिरिक्त वाढ केली आहे.

आयसीसीच्या निवेदनानुसार, ‘इव्हेंट टेक्निकल कमिटीने निर्णय घेतला आहे की, सामना पूर्ण करण्यासाठी आणि निकाल मिळविण्यासाठी अंतिम सामन्याच्या अतिरिक्त दिवसाच्या वेळेत दोन ते चार तासांपर्यंत वाढ केली जाऊ शकतो. टी-२० विश्वचषकातील अंतिम सामना पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या दरम्यान आवश्यक षटकं देखील कापली जातील, परंतु निर्धारित दिवशी किमान षटके टाकली गेली नाहीत, तर सामना राखीव दिवशी खेळला जाईल.

दरम्यान, साखळी सामन्यांमध्ये सामन्यांचा निकाल लावण्यासाठी पाच षटकांचा खेळ होणं गरजेचं होतं. त्यानंतर नॉकआऊट सामन्यात किमान १० षटकांच्या खेळानंतरच सामन्याचा निकाल लावला जाईल, असा नियम होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या