29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home क्रीडा शिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल

शिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल

एकमत ऑनलाईन

वाराणसी : भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन याच्याविरोधात वाराणसी येथे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून काहीकाळ विश्रांतीवर असलेल्या धवनने नुकतीच वाराणसीला भेट दिली. वाराणसीत धवनने बाबा विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले, त्यानंतर कालभैरव मंदिरात जाऊन विशेष अभिषेकही केला. अध्यात्मात तल्लीन झालेल्या धवनने गंगा किनारी जाऊन आरतीत सहभागी होण्याचा आनंदही घेतला होता. वाराणसीत नावेतून फिरतानाचे काही फोटो त्याने पोस्ट केले होते आणि त्यात तो पक्ष्यांना दाणे खाऊ घालताना दिसत आहे. याच कृतीमुळे त्याने स्वत:वर संकट ओढावून घेतले आहे.

वकील सिद्धार्थ श्रीवास्तव यांनी वाराणसी कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणावर ६ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. याआधी वाराणसी जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी त्या नाविकावर कारवाई होईल, असे सांगितले होते. त्या नाविकाने भारतीय क्रिकेटपटूला नियमांबद्दल सांगितले नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?
देशात बर्ड फ्लूचे सावट असताना पक्ष्यांना हाताळणे किंवा त्यांच्या संपर्कात येणे टाळावे असे प्रशासनाने बजावले आहे. तरीही धवनने पक्ष्यांना दाणे खाऊ घातले आणि त्यामुळे त्याच्यावर कारवाईची शक्यता आहे. धवनने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्यानंतर स्थानिक प्रशासनाने त्वरित या प्रकरणाची माहिती घेतली. येथील स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार त्याच्यावर कारवाई होऊ शकते.

आरोग्यदायी लोणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या