25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeक्रीडाचेन्नईचा बंगळुरुवर मोठा विजय

चेन्नईचा बंगळुरुवर मोठा विजय

एकमत ऑनलाईन

मुंबई : धडाकेबाज फलंदाजीनंतर गोलंदाजीतही सर रविंद्र जाडेजाने केलेल्या धमाकेदार खेळीच्या बळावर चेन्नईने बंगळुरुवर ६९ धावांनी मोठा विजय मिळवला. फलंदाजी करताना २८ चेंडूत पाच षटकारांसह ६२ धावा ठोकणाºया रविंद्र जाडेजाने गोलंदाजी करताना ४ षटकात १३ धावा देत ३ विकेटही घेतल्या. तसेच एक गडी धावबादही केला.

१९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरुला २० षटकात ९ बाद १२२ धावा करता आल्या. विजयासाठी दिलेल्या १९२ धावांचे लक्ष्य गाठताना बंगळुरुची सुरुवात चांगली झाली नाही. पडिक्कलने फटकेबाजी करत आशेचा किरण दाखवला. मात्र विराट कोहली ८ धावा करत बाद झाला. यानंतरही वॉशिंग्टन सुंदरही चांगली कामगिरी करु शकला नाही.

अवघ्या ७ धावा करून तो बाद झाला. तिसºया षटकात एबी डिव्हिलियर्स ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर पडिक्कल देखील बाद झाला. त्याने १५ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. बंगळुरुच्या अपेक्षा असलेला मॅक्सवेलही स्वस्तात बाद झाला. त्याने २२ धावा केल्या. जेमिसनने १६ धावांचे योगदान दिले. चेन्नईकडून जाडेजाने ३ ताहिरने २ तर सॅम करन, शार्दुल ठाकूरने एक एक विकेट घेतली.

आधीच कोरोनाचा मारा त्याच चढला उन्हाचा पारा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या