25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeक्रीडाचेन्नईचा राजस्थानवर ‘सुपर’ विजय

चेन्नईचा राजस्थानवर ‘सुपर’ विजय

एकमत ऑनलाईन

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने विजयासाठी पुढे ठेवलेले १८९ लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेला राजस्थान रॉयल्सच्या संघाचा डाव निर्धारित २० षटकांमध्ये ९ गड्यांच्या मोबदल्यात १४३ धावांमध्ये उरकल्याने चैन्नईने हा सामना ४५ धावांनी जिंकला. सलामीवीर जॉस बटलर (४९) वगळता राजस्थानचा एकही खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही.

तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जच्या फाफ डू प्लेसिस, अंबाती रायडू आणि मोईन अलीसह अखेरच्या षटकांमध्ये ब्राव्हाने केलेल्या आक्रमक खेळी २० षटकात ९ बाद १८८ धावांपर्यत मजल मारता आली. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांनी सलामी दिली.

या दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण ऋतुराजला मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो चौथ्या षटकात १० धावा करुन बाद झाला. त्यानंतर मोईन अली आणि डू प्लेसिसने चेन्नईचा डाव पुढे नेला. पण सहाव्या षटकात डू प्लेसिस ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर रियान परागच्या करवी झेलबाद झाला. डू प्लेसिसने १७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार खेचत ३३ धावांची वेगवान खेळी केली.

नागपूरमध्ये लेडी डॉनची भर रस्त्यावर हत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या