23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeक्रीडासहकारीच करायचे शिवीगाळ : रॉस टेलर

सहकारीच करायचे शिवीगाळ : रॉस टेलर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : न्यूझिलंडचा माजी खेळाडू रॉस टेलरने काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता त्याने आपले आत्मचरित्र प्रसिद्ध केले आहे. या आत्मचरित्रात त्याने न्यूझिलंड संघात आपल्याला वंशभेदाचा सामना करावा लागला. सहकारीच शिवीगाळ करायचे, असा धक्कादायक खुलासा ‘रॉस टेलर ब्लॅक अँड व्हाईट’या आत्मचरित्रामध्ये केला आहे.

न्यूझिलंडसारख्या सहसा वादात न सापडणा-या संघात वर्णद्वेष होत असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. रॉस टेलरचे ‘रॉस टेलर ब्लॅक अँड व्हाईट’ हे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. यात रॉस टेलर म्हणतो की,न्यूझिलंडमध्ये क्रिकेट हा एक चांगला खेळ म्हणून ओळखला जातो. मी माझ्या कारकीर्दीत एक वेगळा खेळाडू म्हणून राहिलो आहे. लोक म्हणतील की हा एक फक्त विनोद होता.

याने कोणाचेही कोणतेही नुकसान झालेले नाही. मग आता तुम्ही या गोष्टीला का हवा देत आहात? यापेक्षा तुम्ही गेंड्याच्या कातडीचे व्हा. जे होत आहे ते होऊ द्या. मात्र असे करणे योग्य आहे का? न्यूझिलंडच्या एका वृत्तपत्रात टेलरच्या आत्मचरित्रामधील एक भाग प्रकाशित झाला होता. यात टेलर लिहितो, खेळात पॉलिनेशियन समुदायाचे प्रतिनिधित्व कमी आहे. कधी कधी लोक मी माओरी किंवा भारतीय असल्याचे मानतात. संघातील काही खेळाडूंना देखील वंशभेदी टिप्पणींचा सामना करावा लागला होता.

श्वेतवर्णीय खेळाडूंचे वर्चस्व
रॉस टेलरने सांगितले की, न्यूझिलंडमध्ये श्वेतवर्णीय खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे. याबाबत टेलर म्हणतो की, अनेकवेळा मी खराब फटका मारला की माझ्याविरुद्ध अत्यंत खराब शब्दांचा वापर केला जायचा. मात्र असा फटका संघातील इतर खेळाडूंनी खेळला तर त्यावेळी अशा शब्दांचा वापर केला जात नव्हता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या