23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeक्रीडाकॉमनवेल्थ गेम्स : भारताकडून पाकचा दोनदा पराभव

कॉमनवेल्थ गेम्स : भारताकडून पाकचा दोनदा पराभव

एकमत ऑनलाईन

भारताकडून पाकचा दोनदा पराभव
बर्मिंगहॅम : कॉमनवेल्थ गेम्स २०२२ इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू झाले आहेत. पहिल्या दिवशी बॉक्सर शिव थापाने बॉक्सिंगच्या ६३.५ किलो वजनी गटात पाकिस्तानच्या सुलेमान बलोचचा पराभव केला. त्यानंतर बॅडमिंटनमध्ये भारताने सांघिक प्रकारात पाकिस्तानचा ५-० असा एकतर्फी पराभव केला. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तान भारताकडून दोन वेळा पराभूत झाला.

हॉकीत विजय; क्रिकेट संघ पराभूत :
दुसरीकडे भारतीय महिला हॉकी संघाने घानाचा ५-० असा पराभव करत ग्रुपमधील आपला पहिला सामना जिंकला. मात्र महिला क्रिकेट संघाला विजयी गवसणी घालता आली नाही. रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ३ विकेट्सनी पराभव केला.

बॅडमिंटन : पाकचा सुपडा साफ
भारतीय बॅडमिंटन संघाने सांघित प्रकारात पाकिस्तानला ५-० अशी मात दिली. महिला दुहेरीत त्रीसा जॉली आणि गायत्री गोपिचंदने पाकिस्तानच्या माहूर शाहझाद आणि गाझिला सिद्दीकीचा २१-४, २१-५ असा पराभव केला.

याशिवाय, बॅडमिंटन सांघिक प्रकारात भारताने पाकिस्तानचा पुरूष दुहेरीतही पराभव केला. सात्विक रंकरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी मुराद अली आणि मोहम्मद इरफानचा २१-१२, २१-९ अशा गेममध्ये पराभव केला.

भारताचे बॅडमिंटनपटू अश्विनी पोन्नप्पा आणि बी. सुमित यांनी मिश्र दुहेरीत पाकिस्तानच्या मोहम्मद भाटी आणि गाझिला सिद्दीकी यांचा २१-९, २१-१२ अशा दोन सरळ गेममध्ये पराभव केला. भारताने सांघिक प्रकारात पाकिस्तान विरूद्ध १-० अशी आघाडी मिळवली. ही आघाडी पुरूष एकेरीत कदंबी श्रीकांत याने वाढवली. त्याने मुराद अलीचा २१-७, २१-१२ अशा गेममध्ये पराभव केला. सिंधूने देखील भारत पाकिस्तान सांघिक प्रकारातील तिस-या सामन्यात महिला एकेरीत माहूर शाहझादचा २१-७, २१-६ असा पराभव करत ही आघाडी ३-० अशी वाढवली.

हॉकी : भारताने घानाला चिरडले
महिला हॉकीच्या ग्रुप अ मधील आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने घानाचा ५-० असा पराभव केला.

बॉक्सिंगमध्ये पाकला लोळवले : विशेष म्हणजे भारताने पाकिस्तानचा राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्याच दिवशी दोनदा पराभव केला. बॉक्सर शिव थापाने बॉक्सिंगच्या ६३.५ किलो वजनी गटात पाकिस्तानच्या सुलेमान बलोचचा पराभव केला.

स्विमर नटराजन उपांत्य फेरीत : भारताचा स्विमर श्रीहरी नटराज १०० मीटर बॅकस्ट्रोक पुरूष प्रकारात उपांत्य फेरी गाठली आहे. तो ५४.६८ सेकंद इतकी वेळ नोंदवत हीट ४ मध्ये तिसरे स्थान पटकावले. तो एकूण पाचव्या स्थानावर राहिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या