23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeक्रीडाराष्ट्रकुलमध्ये पदकांची लयलूट, भारताची पदकसंख्या १२ वर

राष्ट्रकुलमध्ये पदकांची लयलूट, भारताची पदकसंख्या १२ वर

एकमत ऑनलाईन

लॉन बॉल, टेबल टेनिसमध्येही सुवर्ण, भारताने घडविला इतिहास
बर्मिंगहॅम : इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय क्रीडापटू चांगलेच फॉर्ममध्ये असून दरदिवशी पदकांची लयलूट सुरू आहे. भारताने सुरुवातीला वेटलिफ्टिंगमध्ये दमदार कामगिरी केली. त्यानंतर विविध क्रीडा प्रकारांतही भारतीय क्रीडापटू बाजी मारत आहेत. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी आज लॉन बॉल आणि टेबल टेनिसमध्ये सुवर्ण कमाई करून भारताने ऐतिहासिक कामगिरी केली असून, भारताच्या खात्यात आता ४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ४ कांस्य अशी १२ पदके मिळाली आहेत.

लॉन बॉल स्पर्धेत भारताच्या लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया आणि रुपाराणी तिर्की या भारतीय महिलांनी इतिहास घडविला. लॉन बॉल क्रीडा प्रकार आतापर्यंत भारतीयांना परिचयाचा नव्हता. मात्र, या चार महिलांनी ऐतिहासिक कामगिरी बजावत सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कडवा संघर्ष मोडून काढत या चौघींनी १७-१० असा विजय मिळविला. ९२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासातील भारताचे या क्रीडा प्रकारातील हे पहिलेच पदक ठरले आहे.

यासोबतच टेबल टेनिसमध्येही पुरुष सघ्ाांच्या गटाच्या अंतिम सामन्यात भारताने पहिल्याच दुहेरी लढतीत विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या हरमीत देसाई आणि साथियन ज्ञानसेकरन या जोडीने अटीतटीच्या सामन्यात सिंगापूरच्या यॉंग ईझाक व येव एन कोएन पँग यांचा पराभव करीत सुवर्ण कमाई केली. हरमित देसाईने जे यू क्लेरेन्स च्यूच्या विरोधात तिस-या गेममध्ये टाय मुकाबला जिंकला. हरमितने सिंगापूरच्या संघाला पराभूत करण्यास मदत करून अंतिम सामन्यात सिंगापूर विरोधात ३-१ ने विजय संपादित करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. टेबल टेनिसमध्ये दुस-यांदा सुवर्ण पदक मिळाले आहे.

यासोबतच वेटलिफ्टिंगमध्ये विकास ठाकूर याने शानदार प्रदर्शन करीत ९६ किलो वजन गटात रौप्य पदक जिंकले, तर हरजिंदर कौरने ७१ किलो वजन गटात कांस्यपदक जिंकले. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ७१ किलो वजनी गटात हरजिंदरने ही कामगिरी केली. हरजिंदर कौरने स्नॅचमध्ये ९३ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११९ किलो असे एकूण २१२ किलो वजन उचलून कांस्य पदक जिंकले. त्यानंतर पंजाब सरकारने त्याला ४० लाखांचे बक्षीस जाहीर केले.

वेटलिफ्टिंगमध्ये सर्वाधिक पदके
भारताने सर्वाधिक पदके वेटलिफ्टिंगमध्ये जिंकली आहेत. भारतीय वेटलिफ्टर्सचा सर्वच वजनी गटांत दबदबा पाहायला मिळत आहे. भारताने याच खेळात आणखी एक पदक मिळवले आहे. या अगोदर काल भारताने ज्युदो खेळात दोन पदके मिळविली. त्यात सुशीलादेवीने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले, तर विजय कुमार याने ६० किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले.

भारताच्या खात्यात १२ पदके
वेटलिफ्टिंगमधील ८ पदकांसह भारताने आणखी ४ पदके जिंकली आहेत. यामध्ये लॉन बाऊल्समध्ये भारतीय महिलांच्या ग्रुपने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवत सुवर्णपदक जिंकले, तर टेबल टेनिसमध्ये पुरुष संघाने फायनलमध्ये सिंगापूरला मात देत सुवर्णपदकावर नाव कोरले. या अगोदर भारताने काल वेटलिफ्टिंगमध्ये २ सुवर्णपदक पटकावले होते. याशिवाय ४ रौप्य आणि ४ कांस्य पदकाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे वेटलिफ्टिंगमध्ये सर्वाधिक तसेच ज्युदोमध्येही दोन पदके पटकावली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या