22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeक्रीडाइंग्लंडच्या कसोटी संघातही कोरोनाचा शिरकाव

इंग्लंडच्या कसोटी संघातही कोरोनाचा शिरकाव

एकमत ऑनलाईन

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये १ जुलैपासून एकमेव कसोटी सामना होणार आहे. हा सामना गेल्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील स्थगित केलेला पाचवा कसोटी सामना आहे. मात्र हा सामना सुरू होण्यापूर्वीच पुन्हा एकदा या कसोटीवर कोरोनाची वक्रदृष्टी पडली आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा सराव सामन्यादरम्यान कोरोनाग्रस्त झाला. तर आता न्यूझीलंडविरूद्ध शेवटची कसोटी खेळत असलेल्या इंग्लंडच्या संघातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विकेटकिपर बेन फोक्सला कोरोनाची लागण झाली आहे.

याबाबतची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विट करून दिली. इंग्लंडने इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज बेन फोक्सचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या जागी आता रिप्लेसमेंट म्हणून सॅम बिलिंग्जचा समावेश करण्यात आला आहे.

फोक्स आता न्यूझीलंड विरूद्ध सुरू असलेल्या उर्वरित तिस-या कसोटीत खेळू शकणार नाही. काल त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे आता त्याला तिस-या कसोटीच्या तिस-या दिवशी विकेटकिपिंग करता आली नाही. त्याच्या जागी जॉनी बेअरस्टोने विकेटकिपिंग केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या