36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeक्रीडाहॉकी इंडियामध्ये 'कोरोना'चा शिरकाव !दोन कर्मचार्‍यांना बाधा

हॉकी इंडियामध्ये ‘कोरोना’चा शिरकाव !दोन कर्मचार्‍यांना बाधा

एकमत ऑनलाईन

भारतीय हॉकीची सर्वोच्च संस्था असलेल्या हॉकी इंडियाच्या कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. दोन कर्मचार्‍यांना बाधा झाली आहे. परिणामी हॉकी इंडियाचे कार्यालय ठराविक काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हॉकी इंडियाच्या कार्यालयातील 31 कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी दोघे जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले असून आणखी दोघांच्या अहवाल लक्षणे दिसली आहेत. त्यामुळे त्यांची पुन्हा कोरोना चाचणी होणार आहे. अशी माहिती आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी पत्रकाद्वारे दिली.

Read More  देशवासीयांची सेवाशक्ती ही आपली खरी ताकद : पंतप्रधान मोदी

कोरोनाची लागण झालेल्या दोन कर्मचार्‍यांपैकी एक अकाऊंट्स विभागातील तर दुसरा ज्युनियर फिल्ड ऑफिसर पदावर कार्यरत आहे. तसेच ज्या दोघांमध्ये करोनाची लक्षणे आढळून आली आहेत, त्यातील एक सहसंचालक आहेत, तर दुसरा डिस्पॅच क्लर्क (कारकून) पदावर कार्यरत आहे, असेही बत्रा यांनी स्पष्ट केले. कार्यालयातील निगेटिव्ह अहवाल आलेले 25 कर्मचारी यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली असून त्यांच्या त्यांच्या घरी 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे.

ज्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली क्वारंटाइन केले आहे. दोन कर्मचार्‍यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत, त्यांनादेखील वैद्यकीय देखरेखीखाली घरातच क्वारंटाइन होण्यास सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या