26.5 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home क्रीडा बॉक्सिंग डे कसोटीतील एक दर्शक कोरोना पॉझिटिव्ह

बॉक्सिंग डे कसोटीतील एक दर्शक कोरोना पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

मेलबर्न : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर २६ डिसेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सीरिजचा दुसरा कसोटी सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्सनी मात केली. यासह मालिकेत १-१ ने बरोबरी झाली आहे. या सामन्याच्या दुस-या दिवशी काही क्रिकेट रसिकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला होता. त्या उपस्थित क्रिकेट रसिकांपैकी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. मेलबर्न क्रिकेट क्लबने बुधवारी (०६ जानेवारी) यासंदर्भात माहिती दिली आहे.

मेलबर्न क्रिकेट क्लबने सांगितले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशी स्टेडियममध्ये उपस्थित असणा-या एका चाहत्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे २७ डिसेंबर रोजी १२.२० ते ०३.३० या वेळेमध्ये स्टेडियमच्या द ग्रेट सदर्न स्टँडच्या झोन ५ मध्ये बसलेल्या सर्व क्रिकेट रसिकांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच तुमचे कोरोना अहवाल येईपर्यंत एकमेकांपासून दूर राहावे.

बॉक्सिंग डे सामना पाहण्यासाठी आलेला चाहता कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने येत्या तिस-या कसोटी सामन्याच्या सुरक्षेसंदर्भात कठोर निर्णय घेतले आहेत. न्यू साऊथ वेल्स सरकारने सिडनीत होणा-या तिस-या सामन्यादरम्यान दर्शकांना मास्क घालणे अनिवार्य केले आहे. तसेच स्टेडियममध्ये ५० टक्केऐवजी केवळ २५ टक्के दर्शकांना प्रवेश देण्यात येणार आहे़ त्यामुळे ठराविक वेळापत्रकानुसार ७ जानेवारी ते ११ जानेवारी या कालावधीत सिडनी येथे तिसरा कसोटी सामना होईल

 

शुभ संकेत!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या