21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeक्रीडाइंग्लंडच्या ताफ्यातील ७ जणांना कोरोना

इंग्लंडच्या ताफ्यातील ७ जणांना कोरोना

एकमत ऑनलाईन

मुंबई : इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी मोठी बातमी समोर येत आहे. इंग्लंडच्या ताफ्यातील सात सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. यामध्ये तीन खेळाडू व व्यवस्थापकीय टीममधील चार खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंच्या संपर्कात इतरही खेळाडू आले आहेत.

इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाने याबाबतचे अधिकृत प्रसिद्धिपत्रक जाहीर केले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सदस्यांना लंडन सरकारच्या नियमानुसार विलगीकरणात जावे लागणार आहे. इतर सदस्यही विलगीकरणात असणार आहेत. पण, तरीही वन डे व ट्वेंटी-२० मालिका होणार असल्याचे इसीबीने जाहीर केले. बेन स्टोक्स याचे संघात पुनरागमन झाले आहे आणि तो संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.

८ तारखेपासून वन डे मालिकेला सुरुवात होणार असून १० व १३ जुलैला दुसरा व तिसरा वन डे सामना होणार आहे. त्यानंतर १६, १८ व २० जुलैला ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात येतील. या मालिकेसाठी इंग्लंडने वन डे संघ जाहीर केला होता. पण, आता सर्व खेळाडूंना विलगीकरणात जावे लागल्याने इसीबी पुन्हा नवी टीम जाहीर करणार आहे आणि त्याचे नेतृत्व बेन स्टोक्स सांभाळणार आहे.

आधी जाहीर केलेला संघ – इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, टॉम बँटन, सॅम बिलिंग, सॅम कुरन, टॉम कुरन, लाएम डॉसन, जॉर्ज गार्टन, लाएम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदील राशिद, जो रूट, जेसन रॉय, डेव्हिड विली, ख्रिस वॉक्स, मार्क वूड, जोस बटलर.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या