23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeक्रीडापाचव्या सामन्यावर कोरोनाचे सावट

पाचव्या सामन्यावर कोरोनाचे सावट

एकमत ऑनलाईन

लंडन : इंग्लंडविरुद्ध भारत ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ ने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत या मालिकेतील चार सामने झाले आहेत. पहिला सामना पावसामुळे अनिर्णित ठरला. दुस-या सामन्यात भारताने विजय मिळवला. त्यानंतर तिस-या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत बरोबरी साधली. चौथ्या कसोटी सामन्यात भारताने जोरदार कमबॅक करत इंग्लंडला पराभूत केले आणि मालिकेत २-१ आघाडी घेतली. त्यातच कोरोनाच्या सावटामुळे पाचवा सामना रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय खेळाडूंना सरावासाठी बाहेर पडू नये, असा आदेश देण्यात आला आहे.

इंग्लंडसाठी पाच कसोटी सामना महत्त्वाचा आहे. हा सामना ंिजकून बरोबरी साधण्याची इंग्लंडची धडपड असणार आहे, तर भारताला पाचवा सामना जिंकून किंवा अनिर्णित राखून मालिका खिशात घालण्याची संधी आहे. असे असताना आता पाचव्या कसोटी सामन्यावर टांगती तलवार आहे. भारतीय संघाचे सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर पाचव्या कसोटीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री, भारत अरुण आणि आर. श्रीधर यांना कोरोनाची लागण झाली आहे. या तिघांना लंडनमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. या तिघांना चौथ्या कसोटीला मुकावे लागले होते.

चौथ्या कसोटी सामन्यावेळी भारतीय संघातील खेळाडू सपोर्ट स्टाफच्या संपर्कात आले होते. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चौथ्या कसोटीवेळी बहुतेक खेळाडू सपोर्ट स्टाफच्या संपर्कात आले होते. गेल्या आठवड्यात सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली होती. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंवरही मर्यादा आल्या असून, आता त्यांना सरावासाठी बाहेर पडणेही कठीण झाले आहे.
१९ सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धा सुरु होणार असल्याने बीसीसीआयची चिंता वाढली आहे. जर खेळाडूंना कोरोनाची लागण झाली तर आयपीएलवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाचवा कसोटी सामना रद्द करण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, पाचव्या कसोटी सामन्यापूर्वीचा संघ सराव रद्द करण्यात आला आहे. खेळाडूंना रुममधून बाहेर पडू नका, असे आदेश देण्यात आले आहेत.

यांना झाली कोरोनाची लागण
भारतीय संघातील रवी शास्त्री यांना पहिल्यांदा कोरोना झाला होता. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या भारत अरुण, आर. श्रीधर या सहाय्यक प्रशिक्षकांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल यांना कोरोना झाला होता. आता भारतीय संघातील ज्युनिअर फिजिओ असलेल्या योगेश परमार यांनाही कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला धक्का बसला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या