23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeक्रीडाचित्रपटाप्रमाणे क्रिकेटचा सामना ‘फिक्स’

चित्रपटाप्रमाणे क्रिकेटचा सामना ‘फिक्स’

एकमत ऑनलाईन

बुकी संजीव चावलाचे दिल्ली पोलिसांकडे धक्कादायक खुलासे

नवी दिल्ली : कोणताही क्रिकेट सामना प्रामाणिकपणे खेळला जात नाही. प्रत्येक क्रिकेट सामन्याचे भवितव्य आधीच ठरलेले असते असा दावा बुकी संजीव चावलाने केला आहे. २००० हॅन्सी क्रोन्जे मॅच फिक्ंिसग प्रकरणातील मुख्य आरोपी असणाºया संजीव चावला याने दिल्ली पोलिसांना जबाब दिला असून यामध्ये त्याने हा खुलासा केला आहे. क्रिकेटमध्ये अंडरवर्ल्ड माफिया तसेच एक खूप मोठे जाळे असल्याचेही संकेत त्याने दिले आहेत. चावला याच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक क्रिकेट सामना हा चित्रपटाप्रमाणे असतो, जो आधीच कोणीतरी दिग्दर्शित केलेला असतो. क्रिकेटचे जेवढे आंतरराष्ट्रीय सामने होतात, जे चाहते आनंद घेऊन पाहत असतात.

संजीव चावलाचा जन्म भारतातील नवी दिल्ली येथे झाला. त्यानंतर तो लंडन येथे व्यवसाय करण्यासाठी गेला. त्याने एक कपड्यांचे दुकान सुरू केले होते. पण त्यानंतर काही कालावधीनंतर तो सट्टेबाज बनला़ लंडनमधून तो सगळा कारभार करत होता. आपण गेल्या अनेक वर्षांपासून मॅच फिक्सिंग करत असल्याचे मान्य करताना त्याने अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. मॅच फिक्स्ािंगमध्ये अनेक मोठे लोक तसेच अंडरवर्ल्ड माफियांचा सहभाग असून ते धोकादायक आहेत. जर आपण काही बोललो तर आपली हत्या करण्यात येईल अशी त्याला भीती आहे.

विशेष पोलिस आयुक्त (क्राईम) परवीर राजन यांनी यासंबंधी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. प्रकरणाचा तपास सुरू असल्याने आपण याबद्दल अधिक माहिती शेअर करू शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे.

Read More  श्रमिकांपैकी ८० टक्के उत्तर प्रदेश आणि बिहारचे

दरम्यान दिल्ली पोलिस क्राईम ब्रँचने आरोपपत्रात संजीव चावला सहकार्य करत नसल्याने गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे सिद्ध होत असल्याचा उल्लेख केला आहे. जामीन मिळाल्याने संजीव चावला सध्या जेलबाहेर आहे. दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे. संजीव चावला याच्यासोबत त्याचे सहकारी कृष्ण कुमार, राजेश आणि सुनीलदेखील जामिनावर आहेत.

संजीव चावला आणि इतरांनी दक्षिण आफ्रिकेच्या २०००च्या भारत दौ-यात मॅच फिक्सिंग केली होती. संजीव चावला आणि हॅन्सी क्रोन्जे यांच्यातील संभाषणातून पैसे आणि संघामधील माहिती दिली जात असल्याचे उघड झाले होते.
संजीव चावलाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १९९३ मध्ये कपड्यांचा व्यवसाय करण्यासाठी तो लंडनला गेला. २००० मध्ये त्याला इंग्लंडचे नागरिकत्व मिळाले. फेब्रुवारी महिन्यात प्रत्यार्पण करत संजीव चावलाला भारतात आणण्यात आले. चावलाला युनायटेड किंगडमने भारताच्या स्वाधीन केले आहे. भारतामध्ये आल्यावर चावलाची चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये चावलाने हे धक्कादायक विधान केले आहे.

आंतरराष्ट्रीय सामन्यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन
कोणताच क्रिकेट सामना प्रामाणिकपणे खेळला जात नाही, सर्व फिक्स असतात; बुकी संजीव चावलाची कबुली २०००च्या मॅच फिक्स्ािंग प्रकरणातील दोषी बुकी संजीव चावलाला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहेत. ‘कोणताही क्रिकेट सामना प्रामाणिकपणे खेळला जात नाही आणि लोक पहात असलेले हे सर्व सामने फिक्स असतात. यामध्ये अंडरवर्ल्ड माफियांचा संबंध असतो. ज्याप्रमाणे चित्रपट कोणीतरी दिग्दर्शित करतो, तसेच क्रिकेट सामन्यांचेही आहे, ‘चावला म्हणाला की, राजेश कार्ला, सुनील दारा आणि कृष्णन कुमार हे माझे जुने मित्र आहेत. हे माझे मित्रही मॅच फिक्सिंग करत होते.

कारवाई थांबविण्यात आली
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोन्जे याने आपण मॅच फिक्सिंग केल्याची कबुली दिली होती. २००२ मध्ये विमान अपघातात त्याचा मृत्यू झाला. यानंतर २०१७ मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्याविरुद्ध कारवाई थांबविण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या