21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeक्रीडाडेव्हिड वॉर्नर झाला सिंधूचा ‘फॅन’

डेव्हिड वॉर्नर झाला सिंधूचा ‘फॅन’

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘शाबास पी. व्ही. सिंधू, आश्चर्यकारक कामगिरी पूर्ण केली.’ अशा आशयाचे ट्विट करत डेव्हिड वॉर्नरने महिला बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे कौतुक केले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शेवटच्या दिवशी भारतीय बॅटमिंटनपटूंनी चमकदार कामगिरी केली. सिंधूने महिला एकेरीचे सुवर्णपदक पटकावून राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची हॅट्ट्रिक केली. भारतातील चाहत्यांनी तिच्या कामगिरीचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे. मात्र, फक्त भारतातच नाही तर परदेशातही सिंधूचे चाहते आहेत. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचाही यात समावेश होतो. वॉर्नरने सुवर्णपदक विजेत्या सिंधूसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे.

‘शाबास पी. व्ही. सिंधू, आश्चर्यकारक कामगिरी पूर्ण केली,’ असे कॅप्शन वॉर्नरने सिंधूच्या फोटोला दिले आहे. त्याच्या या पोस्टवर पत्नी कँडिसने प्रतिक्रिया दिली आहे. कँडिसने ‘खूप छान,’ अशी कमेंट केली आहे. डेव्हिड वॉर्नरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिंधूचा फोटो शेअर केला आहे.

डेव्हिड वॉर्नरला भारताविषयी आणि भारतातील लोकांबद्दल किती प्रेम आहे, हे तो वेळोवेळी आपल्या कृतीतून दाखवून देत असतो. भारतीय चित्रपटांतील गाण्यांचे डान्स व्हीडीओ करून तो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्यामुळे भारतातही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.

दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली आहे. २०१८ मध्ये तिने मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि वैयक्तिक रौप्य पदक जिंकले होते. २०१४ मध्ये तिने वैयक्तिक कांस्य पदक जिंकले होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या