21.8 C
Latur
Wednesday, October 21, 2020
Home क्रीडा ‘डबल हेडर’मध्ये दिल्ली आणि बंगळुरू विजयी

‘डबल हेडर’मध्ये दिल्ली आणि बंगळुरू विजयी

एकमत ऑनलाईन

आयपीएल ट्वेंटी-ट्वेंटी स्पर्धेतील पहिले डबल हेडर सामने या शनिवारी झाले. त्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विराट विजय मिळवला तर दिल्ली कॅपिटल्सने सर्वोच्च धावा रचत कोलकाताला पाणी पाजले. यजुवेंद्र चहलची भेदक फिरकी गोलंदाजी आणि नंतर देवदत्त पडिक्कल, कर्णधार विराट कोहलीची दिमाखदार फलंदाजी याच्या जोरावर बंगळुरू संघाने आयपीएलच्या तेराव्या मोसमातील पंधराव्या अबुधाबी येथील सामन्यात राजस्थानचे आव्हान आठ गडी राखून सहज परतवून लावले. चार सामन्यांतील तिस-या विजयासह बंगळुरू आता चारात आला.

प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाचा डाव २० षटकांत ६ बाद १५४ असा मर्यादित राहिला. अखेरच्या दोन षटकांत राहुल टिवाटियाने केलेल्या धडपडीमुळे त्यांना हे आव्हान शक्य झाले. बंगळुरूने १९.१ षटकांत २ बाद १५८ धावा केल्या. देवदत्त पडिक्कल ६३ आणि विराट कोहली नाबाद ७२ धावांची खेळी त्यांच्या विजयात निर्णायक ठरली. राजस्थानचे आव्हान टी-२० क्रिकेटला नक्कीच कठीण नव्हते. बंगळुरूची फलंदाजी देखील तगडी होती. पण, त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. अ‍ॅरॉन फिंच लवकर बाद झाला. पण, भारतीय क्रिकेटचा उद्याचा चेहरा मानला जाणा-या देवदत्त पडिक्कलने आणखी एक सुरेख खेळी करताना आपल्याबद्दलच्या आशा उंचावल्या. कर्णधार विराट कोहलीच्या साथीत खेळताना तर त्याचा खेळ आणखीनच बहरला. पडिक्कलनेही ते बोलून दाखवले. तो म्हणाला, ‘टीव्हीवरून कोहलीचा खेळ बघत मोठा झालो. आज त्याच्या सोबत खेळण्याचा अनुभव वेगळाच होता. त्याने सतत मला प्रोत्साहन दिले. मी दमलो तेव्हा त्याने जवळ येऊन माझा उत्साह वाढवला. त्याचबरोबर आज त्याची फलंदाजी जवळून बघण्याचा आनंद काही वेगळाच होता.’

पडिक्कल आणि कोहली यांनी दुस-या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. हीच जोडी विजय मिळवून देणार असे वाटत असतानाच आर्चरने पडिक्कलचा त्रिफळा उडवला. त्यानंतर फलंदाजीची सूत्रे आपल्या हातात ठेवत कोहलीने डीव्हिलियर्सच्या साथीत विजय साकार केला. दिल्लीने आयपीएलच्या तेराव्या मोसमातील शारजात झालेल्या सामन्यात बाजी मारली. त्यांनी कोलकाताचा १८ धावांनी पराभव केला. कर्णधार श्रेयस अय्यरची नाबाद ८८ धावांची खेळी आणि त्याला पृथ्वी शॉ, रिषभ पंत यांच्याकडून मिळालेली सुरेख साथ यामुळे दिल्लीने २० षटकांत ४ बाद २२८ धावांची मजल मारली. श्रेयस अय्यरने ३८ चेंडूंत नाबाद ८८ धावांची खेळी करताना ७ चौकार आणि पाच षटकार लगावले. पृथ्वीने आपल्या खेळीत प्रत्येकी चार चौकार आणि षटकार लगावले. कोलकात्याच्या डावात नितीश राणाच्या अर्धशतकी खेळीनंतर डावाच्या शेवटी इयॉन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी यांनी फटकेबाजी केली.

सुशांतची आत्महत्याच -‘एम्स’चा अहवाल

पण, आव्हानाच्या दडपणाखाली त्यांचा डाव ८ बाद २१० असा मर्यादित राहिला. इयॉन मॉर्गनला राहुल त्रिपाठीची साथ मिळाली आणि अचानक सामन्यात रंग भरले. प्रथम त्रिपाठीने १७व्या षटकात स्टोईनिसच्या गोलंदाजीवर तीन षटकारांसह २४ धावा कुटल्या. पुढच्या १८व्या षटकात मॉर्गनने रबाडाला धुतले. त्याने या षटकात तीन षटकारांसह २३ धावा कुटल्या. षटकारांसह धावांचा पाऊस पडायला लागल्यावर कोलकाताचे आव्हान जिवंत झाले. दोन षटकांत ३१ धावा असे समीकरण असताना दिल्लीच्या नॉर्टजेने १९वे आणि नंतर स्टोईनिसने अखेरचे षटक दडपणाखाली अचूक टाकले. मॉर्गन आणि त्रिपाठी फॉर्मात असताना नॉर्टजे याने टाकलेले १९वे षटक निर्णायक ठरले. त्याने या षटकात धोकादायक मॉर्गनची विकेट मिळवताना केवळ पाच धावा दिल्या. त्यानंतर अखेरच्या षटकात स्टोईनिसने आठ धावा देताना त्रिपाठीची विकेट मिळविली. ही दोन षटके दिल्लीच्या विजयात निर्णायक ठरली. जोडीने ३१ चेंडूतच ७८ धावांची भागीदारी केली. पण, ही भागीदारी त्यांना विजय मिळवून देऊ शकली नाही.

डॉ. राजेंद्र भस्मे
कोल्हापूर, मो. ९४२२४ १९४२८

ताज्या बातम्या

दोन आणि तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार : राजेश टोपे

मुंबई : कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावे यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून...

मराठी भाषेचा ऍमेझॉन ऍपमध्ये समावेश

मुंबई : ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेले ऍमेझॉन ऍप आता मनसेच्या इशा-यापुढे नमले आहे. कारण ऍमेझॉन ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला जाणार आहे. ऍमेझॉन ही...

शेतक-यांच्या दु:खाचे होऊ नये हसू!

हे वर्ष जगाच्या इतिहासात मानवाचे सत्व पाहणारे वर्ष म्हणूनच नोंदविले जाईल, यावर आता राज्यापुरते तरी शिक्कामोर्तबच झाले आहे. अगोदर कोरोनाने सगळा देश ठप्प करून...

नियोजनाचा ‘अंधार’

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला आणि पाहता पाहता देशभरात त्याची चर्चा सुरू झाली. या ‘बत्ती गुल’चा फटका लोकल सेवा, मुंबई...

क्वाड आणि आत्मनिर्भर भारत

टोकिओमध्ये काही दिवसांपूर्वी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चतुष्कोनी समूहाची (क्वाड) बैठक झाली. परराष्ट्रमंत्री स्तरावरील ही दुसरी बैठक होती. या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री...

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी साधला थेट शेतकऱ्यांशी संवाद

औरंगाबाद, दिनांक 20 : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पैठण तालुक्यातील मुरमा आणि औरंगाबाद तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट शेतकर्‍यांशी...

प्रथमच देशात करण्यात आली हिंगाची लागवड

नवी दिल्ली : भारतातील जवळजवळ सर्वच घरांमध्ये आवर्जून आढळणा-या मसाल्याच्या पदार्थांपैकी एक म्हणजे हिंग. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग...

राहुल गांधींनी त्या बहिणींना दिला न्याय

वायनाड : काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आपल्या मतदारसंघाच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्वस्व गमावलेल्या दोन बहिणींना घराच्या चाव्या सुपूर्त केल्या. या...

भारताविरुध्द इसिस चा कट उघडकीस

नवी दिल्ली : भारताविरूद्ध सुरू असलेला आयएसआयएस आतंकवादी संघटनेचा मोठा प्लॅन उघडकीस आला असून, आयएसआयएस आतंकवादी संघटनेचे एक द्वेषपूर्ण डिजिटल मासिक हाती लागले आहे. भारताविरूद्ध...

केंद्राकडे बोट दाखविणे म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा

उस्मानाबाद : राज्य सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने प्रचंड मतभेद आहेत. परंतू कांही ही झाले तरी केंद्र सरकारकडे बोट दाखविले जाते. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह सर्वकांही...

आणखीन बातम्या

राजस्थानने आव्हान राखले; चेन्नईच्या आशा धूसर

सोमवारच्या सामन्‍यात चेन्नईला फटकेबाजी करता आली नाही त्यांचे फक्त पाच गडी बाद झाले ते सव्वाशे धावात त्यामुळे राजस्थानला फलंदाजीमध्ये घाई गडबड करण्याची गरज लागली...

सुपर ओव्हरचा ‘डबल’ धमाका

कालचा रविवार खरोखरीच सुपर संडे चा फनडे झाला दोन्ही सामन्यांत सुपर ओढ मध्ये निकाल लागला पहिल्या सामन्यात कोलकातान बाजी मारली तर दुसर्‍या सामन्यात पंजाबन....

मुंबई इंडियनचा एकतर्फी विजय

 तेराव्या आयपीएलमध्ये शुक्रवारी३२व्या.सामन्यात मुंबई इंडियन्सने अबूधाबीतील सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर निर्विवाद वर्चस्व राखून कोलकाता वर एकतर्फी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने गुणतक्त्यातील...

आव्हानांचा पाठलाग करणारे विजयी

शनिवारी झालेल्या सामन्यात पाठलाग करणारे संघ पराभूत झाले होते तर आज रविवारी आव्हानांचा पाठलाग करणारे दोन्ही राजस्थान आणि मुंबई पाच गडी राखून विजयी झाले...

पाठलाग करण्यात पंजाब व चेन्नई अपयशी

मैदान दुबईचे असो, अबु धाबीचे असो वा अगदी शारजाहचे तेराव्या आयपीएलमध्ये गेल्या काही सामन्यात आव्हानाचा पाठलाग यशस्वी होत नाही. पाठलाग करणारा संघ विजयाची आशा...

दिल्लीच्या गोलंदाजीमुळे बंगळूरू पराभूत

काल वापरलेल्या संथ झालेल्या खेळपट्टीवर संयमी फलंदाजी केल्यानंतर कागिसो रबाडा आणि कंपनीने अचूक गोलंदाजी करताना आयपीएलच्या तेराव्या मोसमातील एकोणिसाव्या सामन्यात अबूधाबी येथे दिल्लीला ५९...

मुंबईने पंजाबला रोखले

बंगळुरूविरुद्ध २०६, राजस्थानविरुद्ध २२३ धावांचा डोंगर रचणा-या पंजाबला मुंबईने दीडशेच्या आत गुंडाळले.या विजयामुळे मुंबईने गुणतक्त्यात सहाव्यावरून अव्वल स्थानावर उडी घेतली. तर पंजाब सहाव्या स्थानावर...

विक्रमी विजय मिळवणारा राजस्थान पराभूत

राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकली आणि आधीच्या सामन्याप्रमाणे या वेळेसही प्रतिस्पर्धी संघास फलंदाजीसाठी आमंत्रण देताना आव्हानाचा पाठलाग करणे पसंत केले. यातही...

हैदराबादने गुणांचा भोपळा फोडला

वेगवान आणि फिरकी गोलंदाजांच्या एकत्रित प्रयत्नांच्या जोरावर  हैदराबादने  तेराव्या आयपीएलमधील 11 व्या सामन्यात पहिल्या विजयाची नोंद केली. आणि गुणांचा भोपळा फोडला. त्यांनी गुणतक्त्यात आघाडीवर...

सुपर ओव्हरमध्ये बंगळुरू विजयी

अबुधाबी : सलामीवीर फिंच, पडिकल यांची अर्धशतके आणि एबी डिव्हीलियर्सने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर बंगळुरूने (आरसीबी) मुंबईविरोधात २०१ धावांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर प्रारंभी मुंबईची...
1,308FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...