25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeक्रीडादिल्लीचा पंजाबवर ६ गडी राखून विजय

दिल्लीचा पंजाबवर ६ गडी राखून विजय

एकमत ऑनलाईन

मुंबई : आयपीएलमधील दिल्ली आणि पंजाब यांच्यातील मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेलेला सामना दिल्लीने सहा विकेट्सने जिंकला आहे. सलामीवीर शिखर धवनच्या धडाकेबाज ९२ धावांच्या खेळीच्या बळावर दिल्लीने पंजाबने समोर ठेवलेले १९६ धावांचे शिखर सहज पार केले. दिल्लीने हा विजय मिळवून दोन विजयांसह गुणतालिकेत दुसºया क्रमांकावर झेप घेतली आहे.

पंजाबने ठेवलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने चांगली सुरुवात करुन दिल्ली. ५ षटकात दिल्लीने अर्धशतक धावफलकावर लावले. अर्शदीपने पृथ्वी शॉला ३२ धावांवर बाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला. पृथ्वीने १७ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३२ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या स्मिथला केवळ ९ धावा करता आल्या.

स्मिथ बाद झाल्यानंतर धवनचे शतक हुकले. तो ९२ धावांवर बाद झाला. शिखरने ४९ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह ९२ धावा केल्या. शेवटी कर्णधार ऋषभ पंत आणि मार्कस स्टॉयनिसनं सावध खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. मात्र पंत १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर ललित यादव आणि स्टॉयनिसनं विजयावर शिक्कामोर्तब केले. स्टॉयनिसने १३ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या.

‘रेमडेसिवीर’ जीव वाचविणारे औषध नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या