30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeक्रीडादिल्लीचा विजय, चेन्नईला धक्का

दिल्लीचा विजय, चेन्नईला धक्का

एकमत ऑनलाईन

मुंबई : पहिल्याच सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा धक्का बसला. कारण दिल्ली कॅपिटल्सच्या सलामीवीरांनी यावेळी शतकी भागीदारी रचत दिल्लीला सहजपणे विजय मिळवून दिला. या विजयासह दिल्लीच्या संघाने विजयी सलामी देत दोन गुणांची कमाई केली. दिल्लीने यावेळी सात विकेट्स राखत चेन्नईवर सहज विजय साकारला.

चेन्नईच्या १८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचे पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. पृथ्वी आणि शिखर यांनी १३८ धावांची सलामी दिली आणि संघाच्या विजयाचा पाया रचला. यावेळी शिखरपेक्षा पृथ्वी जास्त आक्रमकपणे फटकेबाजी करत होता. पृथ्वीने यावेळी चौकारासह आपले अर्धशतकही साकारले. पण मोठा फटका मारण्याच्या नादात पृथ्वी बाद झाला. पृथ्वीने यावेळी ९ चौकार आणि तीन षटकारांचा जोरावर ७२ धावांची दमदार खेळी साकारली.

त्यानंतर कर्णधार रिषभ पंत फलंदाजीला आला. धवन आणि पंत यांची जोडी जमली. धवन यावेळी अखेपर्यंत फलंदाजी करत विजयावर शिक्कामोर्तब करेल, असे वाटले होते. पण शार्दुल ठाकूरने धवनला पायचीत पकडले आणि दिल्लीला दुसरा धक्का दिला. धवनने यावेळी १० चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ८५ धावा केल्या. त्यानंतर मार्क टॉयनिस फटकेबाजी करीत होता. मात्र, तो लवकर बाद झाला. मात्र, विजय टप्प्यात असल्याने पंत आणि शॅमरन हेटमायर या जोडीने विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने नाणफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. ऋतुराज आणि फॅफ हे दोघेही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यावर सुरेश रैना फलंदाजीला आला आणि त्यानंतर चेन्नईची धावगती चांगलीच वाढायला लागली. रैनाने मोइन अलीबरोबर चांगली भागीदारी रचली. मोइननेही यावेळी चांगले फटकेबाजी करत २४ चेंडूंत ३६ धावांची भर घातली. या दोघांनी तिस-या विकेटसाठी यावेळी ५३ धावांची भागीदारी रचली. रैनाने षटकार फटकावत अर्धशतकही साजरे केले. पण जडेजाबरोबर खेळत असताना रैना रनआऊट झाला. त्याने ५४ धावा केल्या. अखेरच्या षटकांमध्ये सॅम करन आणि रवींद्र जडेजा यांनी तुफानी फटकबाजी करत १८८ धावांपर्यंत मजल मारली. मात्र, दिल्ली चेन्नईवर भारी पडली.

विकेन्ड लॉकडाऊनला प्रतिसाद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या