22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्रीडासचिनला मुद्दाम जखमी केले; शोएब अख्तर

सचिनला मुद्दाम जखमी केले; शोएब अख्तर

एकमत ऑनलाईन

कराची : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि टीम इंडियाचा दिग्गज सचिन तेंडुलकर यांच्यातील वैर नेहमीच चर्चेत असते. या मुद्यावर बोलताना शोएब अख्तरने मैदानातील एक किस्सा सांगितला आहे, यामध्ये त्याने सचिन तेंडुलकरला जाणूनबुजून जखमी केले असल्याचे म्हटले आहे.

शोएब अख्तरने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सचिनसोबतचा एक किस्सा पहिल्यांदाच शेअर केला आहे. भारतीय क्रिकेट टीम २००६ साली पाकिस्तानच्या दौ-यावर गेली होती. त्या मालिकेतील तिस-या टेस्टमध्ये सचिनला जखमी करणे हा आपला उद्देश होता हे अख्तरने यावेळी कबूल केले.

मी जाणीवपूर्वक सचिनला जखमी करण्याचा प्रयत्न करत होतो. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये सचिनला त्या मॅचमध्ये जखमी करायचे होते. स्टम्पच्या समोरून बॉल टाक असे मला इंझमाम सांगत होता. पण, मला सचिनला जखमी करायचे होते, मी त्याच्या हेल्मेटवर बॉल मारला. त्यावेळी तो जखमी झाला असे मला वाटले.

पण, व्हीडीओ पाहिल्यानंतर सचिन स्वत:ला वाचवण्यात यशस्वी झाल्याचे मला समजले, असा खुलासा अख्तरने यावेळी केला.

तसेच तो पुढे म्हणाला, मी एका बाजूने सचिनला जखमी करण्याचा प्रयत्न करत होतो तर दुस-या बाजूने मोहम्मद असिफ त्याच्या फास्ट बॉलिंगने भारतीय खेळाडूंना सतावत होता. असिफने त्या दिवशी ज्या पद्धतीने बॉलिंग केली तशी बॉलिंग आजवर आयुष्यात कुणीही केलेली मी पाहिली नाही, अशा शब्दांत त्याने असिफचे कौतुक केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या