23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeक्रीडाअसे असूनही टीम इंडिया खेळली

असे असूनही टीम इंडिया खेळली

एकमत ऑनलाईन

कराची : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी कोरोनामुळे रद्द करावी लागली. पाचवी कसोटी रद्द करण्याच्या टीम इंडियाच्या निर्णयाचे पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने समर्थन केले आहे. कोरोनाची भीती लक्षात घेता, भारतीय शिबिराचा हा निर्णय योग्य होता, असे इंझमामने म्हटले. पाच कसोटींच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर होता. पण पाचवी आणि शेवटची कसोटी नियोजित वेळेच्या काही तास आधी रद्द करण्यात आली.

इंझमाम आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये म्हणाला, ‘कोविडमुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी पुढे जाऊ शकली नाही हे दुर्दैवी आहे. ही एक अप्रतिम मालिका होती. भारत चौथा कसोटी खेळला आणि तेही प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचा-याशिवाय. पण त्यांनी मैदानावर प्रचंड उत्साह दाखवला. आता अलीकडच्या काळात त्यांना प्रशिक्षण देणारे त्यांचे फिजिओ देखील पॉझिटिव्ह झाले. खेळाडू खरोखरच घाबरले होते. कारण फिजिओ त्यांच्यासोबत ड्रेसिंगरूम शेअर करत होते आणि त्यांना प्रशिक्षण देत होते.’’

तो पुढे म्हणाला, ‘खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह आली, परंतु अनेकदा कोरोनाची लक्षणे दोन ते तीन दिवसांनी दिसून येतात. सपोर्टिंग स्टाफशिवाय खेळणे खूप कठीण आहे. जेव्हा आपण दुखापतग्रस्त असाल, तेव्हा आपल्याला प्रशिक्षक किंवा फिजिओची आवश्यकता असते. सर्व खेळाडू तंदुरुस्त असूनही भारताने माघार का घेतली असा प्रश्न लोकांना पडला असेल. फिजिओ आणि ट्रेनर महत्त्वाचे आहेत. त्यामुळे खेळाडूंना निगेटिव्ह रिपोर्ट मिळत असूनही भारताने माघार घेतली असे म्हणणे चुकीचे ठरेल.’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या