23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeक्रीडाधोनीने कापला केक; लंडनमध्ये वाढदिवस साजरा

धोनीने कापला केक; लंडनमध्ये वाढदिवस साजरा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय संघाला आपल्या नेतृत्वाखाली दोन विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी गुरुवारी (७ जुलै) ४१ वर्षांचा झाला आहे. त्याचा वाढदिवस इंग्लंडमध्ये खास पद्धतीने साजरा करण्यात आला. धोनीने आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये मंद स्मितहास्य करत केक कापला.

खरं तर, धोनी आणि साक्षीच्या लग्नाचा वाढदिवस ४ जुलैला होता. दोघांच्या लग्नाला १२ वर्षे झाली आहेत. सध्या हे जोडपे सुट्यांसाठी इंग्लंडमध्ये आहे. इथे दोघांनी लग्नाचा वाढदिवसही साजरा केला आणि आता धोनीचा वाढदिवसही साजरा केला.

धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हीडीओ आणि फोटो साक्षीने स्वत: इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत देखील दिसत आहे. पंत सध्या टीम इंडियासोबत इंग्लंड दौ-यावर आहे. एक कसोटी सामना झाला असून आता तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

साक्षीने शेअर केलेल्या व्हीडीओमध्ये धोनीने चमकदार जॅकेट घातलेले दिसत आहे. सगळीकडे विद्युत रोषणाई दिसत आहे. धोनीसाठी एक अप्रतिम केक सजवण्यात आला होता. धोनी आधी मेणबत्ती विझवितो आणि त्यानंतर दोन्ही हातांनी चाकू धरून केक कापताना दिसतो. यादरम्यान व्हीडीओमध्ये बॅकग्राऊंडमध्ये इंग्रजी संगीतही वाजत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या