नवी दिल्ली : धोनीने पडत्या काळात साथ दिली असे म्हणत विराट कोहलीने पुन्हा एकदा धोनीचे कौतुक केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पॉडकास्टमध्ये विराट कोहलीने महेंद्रसिंग धोनीबाबत मोठा खुलासा केला. विराट कोहली महेंद्रसिंग धोनीबद्दल एका कार्यक्रमात बोलत होता.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पॉडकास्टमध्ये विराट कोहलीने महेंद्रसिंग धोनीबाबत मोठा खुलासा केला. विराट म्हणाला, वाईट काळात अनुष्का माझी सर्वांत मोठी ताकद होती. ती पूर्ण वेळ माझ्या पाठीशी उभी होती. माझे बालपणीचे प्रशिक्षक आणि कुटुंबाव्यतिरिक्त, माझ्या वाईट काळात माझ्यापर्यंत पोहोचलेली एकमेव व्यक्ती म्हणजे एम. एस. धोनी.
यावेळी मी माझ्या करिअरमध्ये एक वेगळा अनुभव घेत आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यापासून मला कधीच इतके मोकळे वाटले नाही. मला असा अनुभव अनेक वर्षांनंतर आला आहे.
आपल्या कारकीर्दीतील सर्वांत असुरक्षित वाटण्याच्या प्रश्नावर कोहली म्हणाला – २०१२ मध्ये जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळायला गेलो होतो, तेव्हा पहिल्या २ कसोटी सामन्यांमध्ये मी चांगली कामगिरी केली नव्हती.
पर्थमधील तिस-या कसोटीदरम्यान, मला माहीत होते की, जर मी आज खेळलो नाही तर माझे संघातील स्थान गमवावे लागेल आणि मला पुन्हा प्रथम श्रेणी क्रिकेट खेळावे लागेल. त्या सामन्यात कोहलीने पहिल्या डावात ४४ आणि दुस-या डावात ७५ धावा करत संघातील आपले स्थान पक्के केले.
पुढे विराट म्हणाला, मी धोनीला फोन केला तर तो माझा फोन उचलणार नाही, कारण तो फोन अजिबात पाहत नाही. आजपर्यंत धोनीने मला फक्त दोनदा मेसेज केला आहे. यामध्ये त्याने एकदा लिहिले की, जेव्हा लोक तुम्हाला मजबूत स्थितीमध्ये पाहतात तेव्हा तुम्ही कसे आहात हे विचारायला विसरतात.