16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeक्रीडाधोनीची फिल्मी जगतात एंट्री

धोनीची फिल्मी जगतात एंट्री

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महिंद्रसिंग धोनीने क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले आहे. धोनी हा जगातील महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. त्याचबरोबर क्रिकेटनंतर आता माही फिल्मी दुनियेवर अधिराज्य गाजवण्यास सज्ज झाली आहे. त्याने स्वत:चे प्रोडक्शन हाऊस उघडले आहे. महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, परंतु तो अजूनही आयपीएलमध्ये खेळत आहे.

क्रिकेटच्या मैदानानंतर आता महिंद्रसिंग धोनी फिल्मी दुनियेतही आपला कारनामा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी महेंद्रसिंगने स्वत:चे प्रोडक्शन हाऊस उघडले आहे. धोनी एंटरटेनमेंट या नावाने ते चालणार आहे. लिटस् सिनेमानने रविवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्याने एक फोटो देखील शेअर केला ज्यामध्ये धोनी दिसत आहे. त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव देखील आहे.

महिंद्रसिंग धोनीच्या प्रोडक्शन हाऊसच्या पोस्टरनुसार त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या अंतर्गत तेलुगू, मल्याळम आणि तामिळमध्ये चित्रपट बनवले जाणार आहेत. मागील काही आठवड्यात धोनी जाहिरातीमुळेही चर्चेत आला आहे. ओरिओ बिस्किट त्याने टी२० वर्ल्ड कप २०२२ च्या आधी लाँच केले. तो युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकरसोबत जाहिरातींमध्येही दिसला. महेंद्रसिंग धोनी द अनटोल्ड स्टोरी चित्रपटही त्याच्यावर बनला आहे, ज्यामध्ये सुशांत सिंग राजपूतने काम केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या